Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीला शिवीगाळ करून दगडाचा खलबत्ता डोक्यात, तर बत्ता तोंडावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना थेरगावात घडली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2026 | 12:30 AM
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीला शिवीगाळ करून दगडाचा खलबत्ता डोक्यात, तर बत्ता तोंडावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना थेरगावात घडली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सृष्टी महादु सोनवणे (वय २४, रा. गुरुनानक कॉलनी, थेरगाव, मूळ रा. अहमदपूर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून महादु विनायक सोनवणे (वय ३१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुरुनानक कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादु सोनवणे हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने पत्नी सृष्टी यांच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने सृष्टी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर घरातील दगडाचा खलबत्ता त्यांच्या डोक्यात मारला, तसेच खलबत्त्याचा बत्ता तोंडावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे, तर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सृष्टी यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!

खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

Web Title: An incident where a husband assaulted his wife has occurred in thergaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
1

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
2

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
3

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.