Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक

बारामती तालुक्यात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची तब्बल 1 कोटी 36 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देऊन विश्वास संपादन करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2026 | 06:50 PM
शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक

शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक

Follow Us
Follow Us:
  • बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई
  • बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा
  • टोळीतील आरोपी जेरबंद
बारामती : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता.बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेतली. त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

Daund Crime : अपघाताचा बनाव रचून साडे 6 लाखांचे खोबरे लंपास; दौंड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुरज तिमयया असदकर(रा.पडवळ अळी, गोखले हॉल जवळ, चिंचवड)हा चिंचवडगाव येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

यापूर्वी अजिंक्य पाठक (रा. दौंड )आणि सुधाकर सोळंकी रा. येरवडा, पुणे )या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने जितेंद्र शिंदे विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात वाढत्या गोळीबारानंतर पोलिसांचा धडाका; रात्री 10 नंतर दुकाने होणार बंद

Web Title: Baramati government job fraud fake appointment letter 1 crore 36 lakh cheating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • baramati
  • Job
  • maharashtra

संबंधित बातम्या

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
1

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
2

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
3

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
4

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.