Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

Baramati Pandare MIDC pregnant woman murder: पणदरे येथील एमआयडीसी परिसरात गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माळेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या दोन तासांत संशयित गणेश रामचंद्र माने (वय २६) याला ताब्यात घेऊन अटक केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 08:16 PM
Risod Crime News

Risod Crime News

Follow Us
Follow Us:
  • पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून
  • माळेगाव पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई
  • २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे येथील एमआयडीसी परिसरात निर्गुन खून केलेल्या महिलेच्या बोलण्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून , सदर गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक केली. गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे, ता. बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

याप्रकरणी मयत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैशाली तानाजी पवार असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी पवार व त्यांची पत्नी वैशाली हे पणदरे एमआयडीसी परिसरात राहत होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तानाजी रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता वैशाली या रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. त्यातून गणेश माने याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हातोड्याने हल्ला करून अत्याचार

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने आरोपीने वैशाली यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने विरोध केल्यानंतर तसेच घटनेची माहिती इतरांना कळू नये, यासाठी आरोपीने टॉवेलच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.दरम्यान, मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि पायातील पैजण आरोपीने काढून नेल्याचेही तपासात समोर आले आहे.

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघड

शवविच्छेदनादरम्यान वैशाली या गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर, मानेवर तसेच गुप्तांगावर गंभीर दुखापती आढळून आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हातोडा, घटनेच्या वेळी त्याने परिधान केलेले कपडे तसेच मयत महिलेचे सोन्याचे डोरले व पैजण जप्त केले आहेत. आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद खिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अनिल ओमासे, संजय मोहिते, पोलीस हवालदार महेश पटारे, विजय वाघमोडे, अजय अवकडे, विष्णू गायकवाड, सोफिया शेख, पोलीस अंमलदार अमोल कोकरे, अजिंक्य कदम, श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, विकास राखुंडे, जयसिंग कचरे, राजू शिंदे, सागर पवार व सुलतान डांगे (स्था. गु. शा.) यांनी सहभाग घेतला.या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन

Web Title: Baramati pandare pregnant woman murder malegaon police accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • baramati
  • crime news
  • Malegaon

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
1

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
2

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले
3

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
4

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.