Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Woman Death Case: ‘अथर्व मला गोळी देतोय…’ आईला मुलीचा शेवटचा फोन; काही तासांतच घडलं भयंकर, बारामती हादरलं!

Baramati Woman Death Case: बारामतीमध्ये २३ वर्षीय तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूने संशय निर्माण झाला आहे. एका तरुणासोबत बाहेर गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि काही तासांतच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 12:59 PM
Baramati Woman Death Case: ‘अथर्व मला गोळी देतोय…’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Baramati Woman Death Case: ‘अथर्व मला गोळी देतोय…’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २३ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू
  • मृत्यूपूर्वी आईसोबत झालेला फोन कॉल तपासाचा महत्त्वाचा भाग
  • अथर्व मेहनविरोधात गुन्हा; मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
Baramati Woman Death Case News: बारामतीमध्ये २३ वर्षीय तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका तरुणासोबत बाहेर गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि काही तासांतच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूच्या काही वेळ आधी तिने आईशी फोनवर केलेले संभाषण आता या प्रकरणातील महत्त्वाचा भाग ठरले आहे. या फोनमध्ये संबंधित तरुण तिला एक गोळी देणार असल्याचे तिने सांगितल्याचा दावा आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी अथर्व राजेंद्र मेहन या २७ वर्षीय तरुणाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुणीच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल, रासायनिक तपासणी तसेच उपलब्ध इतर पुरावे तपासले जात आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मृत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील शिक्षण आणि एमपीएससीच्या तयारीसाठी ती पुण्यात क्लासला जात होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या मैत्रिणीकडून आईला अथर्वसोबत तिचे संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आईने मुलीशी नियमित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. Baramati Woman Death Case:

काही काळानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये या नात्याबाबत चर्चा झाली. लग्न करण्याची दोघांची इच्छा असल्याचेही तरुणीने आईला सांगितले होते. एप्रिल २०२६ मध्ये दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि लग्नाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, त्यानंतर परिस्थितीत बदल झाल्याचे आईच्या लक्षात आले. घटनेच्या सुमारे दोन ते तीन आठवडे आधी मुलगी पूर्वीपेक्षा शांत राहू लागली होती. याबाबत आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता अथर्वकडून तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अथर्व तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत असल्याचेही मैत्रिणीने सांगितल्याचे आईने पोलिसांना कळवले आहे.

शेवटचा फोन ठरला महत्त्वाचा

६ ऑगस्ट रोजी दुपारी अथर्व कार घेऊन तरुणीला बारामतीतील टी.सी. कॉलेजमध्ये प्रवेशाच्या कामासाठी घेऊन गेला होता. त्यानंतर दोघे त्याच्या आई आणि मावशीला सोडण्यासाठी जात असल्याचे तिने आईला कळवले. काही वेळाने आईने व्हिडिओ कॉल केला तेव्हा मुलगी अथर्वसोबत असल्याचे दिसले.

संध्याकाळी आईने पुन्हा मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोन न उचलल्याने तिने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी मुलीशी बोलणे झाले. आईच्या म्हणण्यानुसार, या संभाषणात मुलीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असून, तो तिला एक गोळी देणार असल्याचेही तिने सांगितल्याचा दावा आहे.

हे ऐकल्यानंतर आईने मुलीला त्याच्यासोबत जाऊ नये आणि तातडीने घरी परतावे, असे सांगितले. रात्री सुमारे नऊ वाजता आईने मेसेज केला असता मुलीने जेवण करत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

रात्री दहाच्या सुमारास पुन्हा फोन केला असता अथर्वने फोन उचलला. तरुणीला अचानक चक्कर आल्याचे त्याने सांगितले. तिला उपचारासाठी आधी एका रुग्णालयात, त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. शेवटी तिला सिल्वर जुबली रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई तेथे पोहोचेपर्यंत मुलगी स्ट्रेचरवर होती. काही वेळाने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तपासानंतरच सत्य समोर येणार

अथर्वने तरुणीला आपल्या घरी नेले होते आणि तेथे दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्यानंतर तिला अचानक त्रास सुरू झाल्याचे त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे तरुणीच्या आईने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

सध्या पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक कडी तपासली जात आहे. तरुणीने घेतलेली किंवा तिला देण्यात आलेली औषधे कोणती होती का, तिच्या शरीरात कोणता पदार्थ आढळतो का, तसेच तिच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. मोबाईलमधील संभाषण, कॉल रेकॉर्ड, इतर डिजिटल माहिती आणि वैद्यकीय पुरावेही तपासले जात आहेत. या तपासातूनच तरुणीच्या मृत्यूमागचे खरे कारण समोर येणार आहे. त्यामुळे सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Baramati woman death case 23 year old dies after health deteriorates police probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • crime news delhi
  • Maharshtra news
  • pune crime case

संबंधित बातम्या

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा
1

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
3

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
4

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.