रिलस्टार अथर्व सुदामेला पीएमपीएमलची परवानगशीशिवाय शुट केल्याने कायदेशीर नोटीस (फोटो - सोशल मीडिया)
पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसमध्ये अथर्व सुदामेने व्हिडिओ शुट केला. पीएमपीएमलची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये रिल शुट केल्यामुळे रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे. अथर्वने महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीची रिल शुट केल्यामुळे त्याचबरोबर कोणत्याही परवानगी शिवाय हे शुट केल्यामुळे पीएमपीएमलने शुक्रवारी (दि.02) रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर सदर रिल ही सोशल मीडियावर काढून टाकण्याचे देखील सांगण्यात आले असून सात दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर असे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील रिलस्टार अथर्व सुदामेला देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
पीएमपीएमलच्या मालकीच्या असणाऱ्या बसमध्ये अथर्व सुदामेने परवानगीशिवाय रिल शुट केली. त्याचबरोबर गणवेश, बिल्ला आणि ई-तिकीट मशीनचा कोणत्याही परवानगीशिवाय वापर केला. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता रिल सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. या रिलमधून महिला प्रवाशांचा अपमान करण्यात आला असून त्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षेला धक्का पोहचत आहे. तसेच या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वासाला तडा जात आहे. त्याचबरोबर पीएमपीएमलच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसत असल्याचे देखील नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष…
याबाबत पीएमपीएमएलकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पंकज देवरे यांनी मत मांडले आहे. पंकज देवरे म्हणाले की, “पीएमपीचा परिसर आणि मालमत्ता असलेल्या ठिकाणी शुटिंग करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज असते. मात्र रिलस्टार अथर्व सुदामे याने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्याचबरोबर एमपीएमएलच्या धोरणाच्या विरोधात असलेले कृत्य केले आहे. यामुळे पीएमपीची प्रतिमा डागाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे व्यावसायिक हित आणि सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास कमी होत आहे. सात दिवसांच्या आतमध्ये संबंधित चित्रिकरण काढून टाकले नाही आणि लेखी स्पष्टीकरण दिले नाही तर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट मत पंकज देवरे यांनी व्यक्त केले आहे.






