बारमेर : राजस्थानच्या (Rajasthan) बारमेर जिल्ह्यातील (Barmer District) नागाना पोलीस स्टेशन (Nagana Police Station) परिसरात खेळत असताना अचानक एक निष्पाप मुलगा पाण्याच्या टाकीत पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या ६ वर्षांच्या बहिणीनेही टाकीत उडी घेतली (6 Years Sister Jump Into Tank). दरम्यान, कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. नंतर दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बारमेर येथील शासकीय रुग्णालयाच्या (Government Hospital) शवागारात आणले, तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ही घटना रविवारी साक्रोडा चोखला गावात घडली, अशी माहिती नागना ठाणे प्रभारी नरपतदान यांनी दिली. त्यांचा ४ वर्षांचा निष्पाप नातू भाऊ रविवारी सायंकाळी घराबाहेर खेळत असल्याची माहिती मृत मुलांच्या आजोबांनी नागाणा पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, तो अचानक तेथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या आत पडला. भाऊ टाकीत पडला हे कळताच शेजारीच खेळत असलेली त्याची मोठी बहीण मनीषा (६ वर्ष) हिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही. तिनेही पाण्याच्या टाकीत उडी घेतली. टाक्यांमध्ये पाण्यात बुडून दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
[read_also content=”गुजरातच्या माजी DGP ला बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा कट, एटीएसने केला पर्दाफाश, ५ जणांना अटक https://www.navarashtra.com/crime/conspiracy-to-implicate-gujarats-crime-news-former-dgp-in-rape-case-ats-busted-5-arrested-nrvb-369525.html”]
याबाबत नातेवाईकांना समजताच खूप उशीर झाला होता. मुलांना टाकीत उतरून बाहेर काढेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी मृताच्या आजोबांच्या अहवालाच्या आधारे तपास सुरू केला आहे. दोन्ही मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की आणखी काही कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
[read_also content=”विद्यार्थिनी भाऊजींच्या भावसोबत निघाली होती, नराधमांनी मध्येच वाट अडवली, मानेवर केला चाकूने वार; त्यानंतर पुढे… https://www.navarashtra.com/crime/gopalganj-crime-news-miscreants-stabbed-girl-student-who-came-out-with-brother-in-laws-brother-nrvb-369506.html”]