Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4... फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर
एअरटेल त्यांच्या ग्राहकांना दोन पोस्टपेड फॅमिली प्लॅन ऑफर करतो आणि ज्यामध्ये एकाच प्लॅनचा फायदा 4 यूजर्स घेऊ शकतात. यातील एका प्लॅनची किंमत 1199 रुपये आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत 1399 रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जातात आणि कोणत्या यूजरला किती डेटा मिळतो, याबाबत आताा सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 100 जीबी डेटा मिळणार आहे आणि इतर 3 यूजर्सना 30-30-30 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना 190 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये एक रेगुलर सिम आणि तीन अॅड-ऑन सिम मिळणार आहेत. यूजर्सना अनलिमिटिड कॉलिंग आणि यासोबतच एसटीडी रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी फायद्यांबाबत जाणून घेऊया. यूजर्सना 6 महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 1 वर्षासाठी जियो-हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शनसह प्लॅनमध्ये अॅपल टीव्हीमध्ये अॅपल म्युझिक सबस्क्रिप्शन देखील येते. प्लॅनमध्ये Adobe एक्सप्रेस प्रीमियमचा 12 महिन्यांचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 4 हजार रुपये आहे.
कपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 जीबी डेटा मिळणार आहे आणि इतर 3 यूजर्सना 30-30-30 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 240 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. प्लॅनमध्ये एक रेगुलर सिम आणि तीन अॅड-ऑन सिम मिळतात. यूजर्सना अनलिमिटिड कॉलिंग आणि यासोबतच एसटीडी रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. 6 महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन आणि 1 वर्षासाठी जियो-हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शनसह प्लॅनमध्ये अॅपल टीव्हीमध्ये अॅपल म्युझिक सबस्क्रिप्शन देखील येते. प्लॅनमध्ये Adobe एक्सप्रेस प्रीमियमचा 12 महिन्यांचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 4 हजार रुपये आहे.






