पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO 'या' तारखेला होणार खुला (Photo Credit- X)
कंपनीचा आयपीओ मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३२ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३२ च्या पटीत बोली लावू शकतात. आयपीओपूर्व आणि प्राईस बँड जाहिरातीच्या तारखेनुसार आऊटस्टॅन्स्डिंग इक्विटी शेअर्सची संख्या २,१८६६,४०० (दर्शनी मूल्य ₹१०) इतकी आहे. हा आयपीओ ₹३,८०० दशलक्ष पर्यंतचा नवीन इश्यू (Fresh Issue) आहे.
या नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ₹२,८६५.६४ दशलक्षचा वापर १५ नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी केला जाईल. तसेच, ₹३५४.०० दशलक्ष या १५ नवीन स्टोअर्सच्या लाँचशी संबंधित विपणन (Marketing) आणि प्रचारात्मक खर्चासाठी वापरले जातील, ज्याचा उद्देश ‘रेवा’ (Reva) या फ्लॅगशिप ब्रँडची स्थानिक जागरूकता आणि दृश्यमानता वाढवणे हा आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.
हा इश्यू ‘बुक-बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे राबवला जात आहे. यामध्ये निव्वळ इश्यूच्या (Net Issue) किमान ७५% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), तर जास्तीत जास्त १५% हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि १०% हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (Retail) राखीव ठेवण्यात आला आहे.
३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ₹१,५६७.१८ दशलक्ष होता आणि निव्वळ नफा ₹२०१.३३ दशलक्ष होता. आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये कंपनीचा महसूल ₹२,५८१.८३ दशलक्ष होता, जो आर्थिक वर्ष २०२३ (FY23) मधील ₹१,९८८.४८ दशलक्षच्या तुलनेत वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये निव्वळ नफा ₹५९४.७४ दशलक्ष होता, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ₹५१७.४७ दशलक्ष होता. स्मार्ट होरायझन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे या इश्यूचे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ आहेत आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे ‘रजिस्ट्रार’ आहेत.
परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI






