Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

बार्शी येथे मुंबई-कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहा जणांना ताब्यात घेतले. रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 06:25 PM
पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
  • रोख रकमेसह मोबाईल व एक लाख 82 हजाराचा ऐवज जप्त
  • गुपित चालू होता मुंबई कल्याण मटका जुगार
बार्शी : उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीत गुटखा साठ्यावर धाडीची कारवाई झाल्यानंतर काल दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील तेल गिरणी चौकातील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानाजवळच्या आडोशाला बसून मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असताना माजी नगराध्यक्ष श्रीकांत पिसे यांचा मुलगा अजिंक्य श्रीकांत पिसे, माजी नगरसेवक सोमनाथ पिसे यांचा मुलगा गणेश पिसे, यांच्यासह सहा जणांना रोख रक्कम व मोबाईल सह निर्भया पथकाने पकडले आहे.

या कारवाईत पिसे बंधुंसह सुदेश पांडुरंग कोळपे वय 36 सुभाष नगर, विजय दत्ता गवळी वय 28 खुरपे बोल, अमोल भास्कर पवार वय 42 राऊत चाळ, दिनकर अर्जुन कांबळे व 44 राहणार तांदुळवाडी रोड कळंब यांच्याबरोबर एकूण सहा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 22 हजार रुपये रोख व एकूण पाच मोबाईल चे हँडसेट व जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार

या कारवाईत निर्भया पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडूळे ,नम्रता गटकुल ,चालक पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर यांनी भाग घेतला.पिसे बंधूंना मटका जुगाराचा मोठा इतिहास असून त्यांच्यावर आज पर्यंत अनेक वेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मात्र त्यांची संघटित गुन्हेगारी वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर मोका कायदा लावण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कारवाईच्या मालिकेमुळे बार्शीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Sangli Crime: ‘तुला मुलगा होत नाही’ म्हणत टोमणे, मारहाण आणि छळ, तब्ब्ल ११ वर्ष विवाहितेने केलं सहन; तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू

Web Title: Barshi matka gambling raid six booked including former municipal chief son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
4

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.