काय घडलं नेमकं?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे केज येथे ट्युशनसाठी येत होती. या मुलीची धीरज सांजुरे नावाच्या तरुणाशी पूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवला. ६ जानेवारी रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखवले होते.
७ जानेवारीला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी ट्युशनसाठी केज येथे आली.आरोपीने तिला कारमध्ये बसवले. सुरुवातीला तिला नेहमीच्या मार्गावर नेले जात असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र त्याने कारची दिशा बदलून केज येथून थेट धारूर तालुक्यातील अंबाचोंडी परिसरातील डोंगराळ भागात नेले. त्याने आधी आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून घेतली. कार थांबवले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.
मुलगी घरी परतली. तिने या बाबतची माहिती पालकांनी तातडीने पीडित मुलीसह केज पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी धीरज सांजुरे याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास केज पोलीस करत आहे.
आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार
बीड शहरातून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील अंकुश नगर परिसरात भरदिवसा नाल्याचे काम करत असलेल्या एका कामगारावर आधी गोळीबार करण्यात आला मात्र नेम चुकला म्हणून आरोपीने पाठलाग करत धारदार शास्त्राने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल (मंगळवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात.
Ans: पीडित मुलगी 15 वर्षांची अल्पवयीन आहे.
Ans: कारमध्ये बसवून डोंगराळ निर्जन भागात नेऊन अत्याचार केला.






