काय नेमकं प्रकरण?
उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळून आला नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ उमरगा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाचा चेहरा आरोपींनी विद्रूप केला होता. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते.
आपल्या अनुभवाच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली. शेजारील शेतकरी, स्थानिक नागरिक यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशी करण्यात आली. अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतांची ओळख पटवण्यात यश आले. पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल होऊन तपास केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स व इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी केली.
पोलिसांनी तपासातून शिवाजी दत्तू दूधनाळे (वय 32) आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी (वय 34) यांचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
कशी केली हत्या?
रविवारी पहाटे आरोपी शिवाजीने शाहूराजला दारू पाजली. त्यानंतर रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला उमरगा बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यावर नेले. तेथे शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली नंतर जमिनीवर पाडण्यात आले. त्यानंतर हंटर आणि दगडाने त्याच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. यात शाहूराज सूर्यवंशी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
का केली हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शाहूराजची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. या कारणावरून शाहूराज आणि गौरी यांच्यात सतत वाद होत होते. शाहूराज अडथळा ठरत असल्याने गौरी आणि शिवाजी यांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. आणि त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Ans: शाहूराज महादू सूर्यवंशी (वय 35).
Ans: पत्नी व प्रियकरातील अनैतिक संबंधातून.
Ans: पत्नी गौरी सूर्यवंशी व तिचा प्रियकर शिवाजी दूधनाळे.






