Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

बीड आणि सोलापूरमधील कथित बनावट ट्रस्ट प्रकरणात एटीएसच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजलगावच्या 'गुलजार-ए-रजा' आणि बार्शीच्या 'अल हलिमी' ट्रस्टचे कथित आर्थिक व्यवहार पाकिस्तानातील वादग्रस्त 'दावत-ए-इस्लामी' संस्थेशी व शहजाद भट्टी गँगशी संबंधित असल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 10:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीड आणि बार्शीतील कथित बनावट ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची एटीएसकडून चौकशी सुरू.
  • ४.७३ कोटी आणि १० कोटी रुपयांच्या देणग्यांचे संशयास्पद व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी.
  • पाकिस्तानातील वादग्रस्त संस्थेशी आणि शहजाद भट्टी गँगशी कथित संबंधांचा तपास सुरू.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तपासातून बीड आणि सोलापूर जिल्ह्यांतील बनावट ट्रस्ट प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमधील ‘गुलजार-ए-रजा’ आणि बार्शीतील ‘अल हलिमी’ या कथित बनावट ट्रस्टचे आर्थिक व्यवहार थेट पाकिस्तानातील वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’ संस्थेशी आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी संबंधित असल्याचा संशय एटीएसच्या तपासात व्यक्त करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या देणग्या, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि तरुणांशी असलेल्या संपर्कामुळे या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, एटीएसकडून सर्व आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

नेमकं काय प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरच्यादहशतवाद विरोधी पथकाच्या बीड युनिटने काही महिन्यांपूर्वी मजळगावातील ‘गुलजार-ए-रजा’ या बनावट ट्रस्टचा भांडाफोड केला होता. या ट्रस्टने ५ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तब्बल ४ कोटी ७३ लाख रुपयांची देणगी जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. अटक केलेले आरोपी सध्या कारागृहात आहेत. सध्या या संस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे.

बार्शीतील ‘अल हलिमी’ ट्रस्टवरही एटीएसची कारवाई

दरम्यान, अशाच प्रकारचे संशयास्पद आर्थिक व्यवहार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘अल हलिमी’ नावाच्या कथित बनावट ट्रस्टमध्येही समोर आले. या ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक देणग्या जमा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. एटीएसच्या तपासात या ट्रस्टचे पाकिस्तानातील वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’ संस्थेशी तसेच कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी संबंधित आर्थिक दुवे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

एटीएसच्या रडारवर आर्थिक व्यवहार आणि तरुणांचे नेटवर्क

तपास यंत्रणांकडून दोन्ही ट्रस्टच्या बँक व्यवहारांची, देणगीदारांची आणि निधीचा वापर नेमका कुठे झाला याची बारकाईने पडताळणी केली जात आहे. याशिवाय या संस्थांच्या संपर्कात आलेले तरुण, त्यांचे व्यवसाय, त्यांचे परदेशातील संपर्क आणि इतर धर्मादाय संस्थांशी असलेले संबंध यांचाही तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून देशविघातक कारवायांना निधी पुरवला गेला होता का, याचाही शोध एटीएस घेत आहे.

आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

या प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांचा तपास अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. राज्यातील सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Girish Mahajan Fake AI Photo: गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो;

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या दोन ट्रस्टचा तपास सुरू आहे?

    Ans: 'गुलजार-ए-रजा' (बीड) आणि 'अल हलिमी' (बार्शी).

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS).

  • Que: तपासात कोणत्या बाबींची चौकशी सुरू आहे?

    Ans: आर्थिक व्यवहार, देणग्या, संबंधित व्यक्ती आणि कथित परदेशी संपर्क.

Web Title: Beed crime pakistani connection to a fake trust in beed shocking revelation in ats investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.