काय घडलं नेमकं?
मंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. गिरीश महाजन यांनी हे फोटो बनावट असल्याचे सांगितले. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी गुन्हा दाखल केला. राज्याच्या सायबर सेलने तांत्रिक तपासणीअंती हे फोटो बनावट असल्याची माहिती दिली होती. यांनतर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संशयित आरोपी बालाजी म्हस्के याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
फेसबुक खाते कायमचे बंद
पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीने बदनामीकारक मजकूर पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता. त्याचे फेसबुकवर सुमारे ६ हजार फॉलोअर्स होते. सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आरोपीचे हे फेसबुक खाते कायमचे बंद (Terminate) केले आहे. पोलिसांनी आरोपीविरूष भाटिया न्याय संहिता (BNS) कलम 356 (3), 66 (C), 67 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी…
Ans: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून.
Ans: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान.
Ans: आरोपीला अटक करून मोबाईल जप्त केला आणि त्याचे फेसबुक खाते कायमचे बंद केले.






