तुम्हीही बाहेर जाताना घराची चावी अशाप्रकारे ठेवताय? तर थांबा; ‘इथं’ झाली मोठी चोरी
गर्भपातासाठी शासनाने काही नियम दिलेले आहेत. मात्र तरीही वैधकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. एवढेच नाही तर संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.(Beed Crime)
तर दुसरीकडे उपचारानंतर अल्पवयीन तरुणीचा पत्ता लागत नाही आहे. (Beed Crime) तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजलगाव ग्रामीण पोलिसांनी बालविवाह केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे. (Beed Crime)
लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर बायको गर्भवती राहिली. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असून तिचा बाल विवाह लावून देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीवर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Ans: गर्भपात प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.
Ans: बालविवाह प्रकरणात पती, सासू, सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






