Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

Murder Case : बीड हादरलं! दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या पत्नीने रागाच्या भरात काळ्या तारेने गळा आवळून पतीची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिने मृतदेह रुग्णालयात नेला आणि पतीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचा खोटा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 03:03 PM
Beed Crime : पती खूप दारु पित होता... पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

Beed Crime : पती खूप दारु पित होता... पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

Follow Us
Follow Us:
  • बीड जिल्ह्यातील एका कुटुंबातील धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
  • संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर अनपेक्षित माहिती समोर आली.
  • प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
राज्यात काैंटुबिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वाद कधी भीषण रुप घेईल ते सांगता येत नाही आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडून आले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.

ही तर सियापेक्षा खतरनाक निघाली! पतीचा खून, बाथरूम मृतदेह पुरला अन् 45 दिवस बाजूलाच…; रुबीच्या गुन्ह्याचा धक्कादायक पर्दाफाश

पतीच्या दारुला कंटाळली होती पत्नी

सदर घटना ही बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथून समोर येत आहे. मृताची ओळख शरीफ पठाण अशी पटली असून, त्याची पत्नीची ओळख नसरीन पठाण अशी पटली आहे. पती शरीफ नेहमीच दारुच्या नशेत पत्नी नसरीनला घरी येऊन त्रास द्यायचा. स्थानिकांच्या मते, दोन्ही नवरा-बायकोंमध्ये नेहमीच भांडण होत असायची. पतीच्या दारुला कंटाळलेली नसरीन मानसिक तणावातही गेली होती. घटनेच्या रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले ज्यानंतर पत्नी नसरीनला आपला राग सहन करता आला नाही. तिच्या मनात नवऱ्यासाठी तुडुंब द्वेष भरला होता. अशात त्या भांडणात हा द्वेष एकदाच बाहेर निघाला आणि घरात असलेल्या काळ्या वायरनेच तिने गळा आवळत पतीचा खून केला.

मुलीचे फोटो व्हायरल झाले अन् कुटुंबात रक्तरंजित थरार; मामानेच संपवला भाच्याचा जीव, पेट्रोलने मृतदेहाला टाकलं जाळून…

हार्ट अटॅकचा खोटा बनाव

पतीच्या हत्येनंतर नसरीन घाबरली आणि तिने स्वत:ला वाचवण्यासाठी पतीच्या हत्येच्या खोटा बनवा रचला. शरीफला हार्ट अटॅक आला आहे असे सांगत तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलसांना मात्र मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पत्नीच्या या कहाणीवर संशय आला. यानंतर सक्तीने चाैकशी केल्यानंतर नसरीन पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. दुसरीकडे मृत्यूचे खरे कारण शोधून काढण्यासाठी मृतदेहाला शवविच्छेदनासाठीही पाठवण्यात आले होते. याच्या अहवालातही मृत्यूचे कारण गळा आवळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या प्रकरणात शरीफ यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन आई नसरीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Beed wife allegedly strangles husband with wire after fight fakes heart attack to mislead police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
2

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड
3

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम
4

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.