काय नेमकं प्रकरण?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेंद्र कुमार शर्मा (४४) असे आहे. सुरेंद्र कुमार शर्मा हा १८ मेपासून बेपत्ता होता. त्याला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक दिवस रात्र एक करत होते. यावेळी त्याची पत्नी रुबी एकच सांगत होती. माझा नवरा कुठे तरी गेलाय. तो परत येईल, असं ती वारंवार सांगत होती. त्यांनतर तिने २६ मे रोजी सुरेंद्र हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना अनेक गोष्टी संशयापसाद वाटल्या.
बाथरूममध्ये खोदकाम आणि…
३ जुलै शुक्रवारी पोलीस पुन्हा एकदा सुरेंद्रच्या घरी गेले. तेव्हा रुबीचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. याचवेळी सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मानेही पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी सुरेंद्रच्या घराचा तपास करण्याचा निर्णय घेतला. तपास करत असतांना पोलिसांची नजर बाथरूममधील लादीकडे गेली. बाथरूममध्ये ताजं प्लास्टर केल्याचं लक्षात आलं. तेव्हा पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुरेंद्रची डेडबॉडी सापडली.
Ketan Agrawal Murder Case: ‘जे लग्न होणार नाही…’; सियाच्या कथित चॅटमधून धक्कादायक प्लॅनिंगचा खुलासा!
पोलिसांनी रुबीला केली अटक
बॉडी सापडताच पोलिसांनी रुबीला तव्यात घेतलं. तिची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. हत्येच्या आधीच बाथरूमचं काम करण्यासाठी मिस्त्री आणि मजदूर बोलावण्यात आले होते, असं रुबीने पोलिसांना सांगितलंय.
कशी केली हत्या?
या हत्येच्या दिवशी रूबीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. तिने आधी दोन्ही मुलींना सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर घरात कोणी नसताना तिने सुरेंद्र यांना रात्री खिरीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून दिल्या. सुरेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर तिने त्यांचा गळा आवळून जीव घेतला. हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रूबीने बाथरूममध्ये एक मोठा खड्डा खणला. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या कामासाठी आधीच मिस्त्री आणि मजूर बोलावून पूर्वतयारी केली होती. तिने सुरेंद्र यांचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडला आणि मिस्त्रीकडून वरून पुन्हा सिमेंट टाकून नव्या फरश्या बसवून बाथरूम तयार करून घेतलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी विचारल्यास, “ते कुठेतरी निघून गेले आहेत, लवकरच परत येतील” असे सांगत ती नाटक करत राहिली.
सुरेंद्रच्या भावाने काय सांगितलं?
सुरेंद्रला दारूची लत होती. त्यामुळे दोघा पती पत्नीत वारंवार भांडणं व्हायची. सुरेंद्र गायब झाल्यानंतर रुबीनेच फोन करून आम्हाला बोलावून घेतलं. त्यानंतर तो गायब झाल्याची तक्रार केली गेली. आमचं सर्व कुटुंब सुरेंद्रचा शोध घेत होतं. पण काहीच सुगावा लागला नाही, असं सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्माने सांगितलं.
तपास सुरु
या हत्येच्या कटात रूबीसोबत इतर कोणी सामील होते का? तसेच ज्या मिस्त्री आणि मजुरांना बोलावले होते, त्यांना फक्त दुरुस्तीचे काम सांगण्यात आले होते की त्यांनाही या कटाची माहिती होती? पोलीस सध्या फॉरेन्सिक टीमच्या मदतीने, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या सर्व प्रश्नांचा सखोल तपास करत आहेत. आरोपी रूबी शर्मा सध्या पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Ketan Agrawal Muder : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
Ans: 45 दिवस बेपत्ता असलेल्या सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बाथरूमच्या फरशीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळला.
Ans: सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नी रुबीला अटक करण्यात आली असून, तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
Ans: हत्येत केवळ रुबीच सहभागी होती की आणखी कोणाचा सहभाग होता, तसेच गुन्ह्याची संपूर्ण योजना कशी आखण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत.






