Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

Rape Case : बिहारच्या औरंगाबादमध्ये नेपाळी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 11:56 AM
लज्जास्पद! बिहारच्या औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

लज्जास्पद! बिहारच्या औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

Follow Us
Follow Us:
  • नेपाळी तरुणीवर जीर्ण इमारतीत तिघांकडून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी दोन आरोपींना अटक; अल्पवयीन आरोपीला सुरक्षित ताब्यात.
  • पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; वैद्यकीय तपासणी व स्पीडी ट्रायलअंतर्गत कारवाई सुरू.
गँगरेपच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता बिहारच्या औरंगाबादमध्ये एका नेपाळी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. महिला आपल्या पतीसोबत राहते. ही घटना मंगळवारी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इरिगेशन कॉलनीजवळील एका जीर्ण इमारतीत घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून राकेश कुमार, महुआ शहीद मोहल्ला, अभिषेक कुमार अशी त्यांची ओळख पटली आहे. अभिषेक आणि राकेश औरंगाबादमध्ये टोटो चालवण्याचे काम करतात.

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

महिला नेपाळला राहत होती

मिळालेल्या माहितीनुसार, गँगरेप पिडित महिला नेपाळची रहिवाशी आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे दुसऱ्यांदा लग्न झाले होते, ज्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. व्यक्तीला पहिल्या पत्नीपासून चार मुले असून तो बाजारात चहा विकण्याचे काम करतो आणि महिला लहान मुलांवर देखरेख ठेवण्याचे काम करते. २१ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता ती घराबाहेर उभी होती. याचवेळी त्याच परिसरात राहणारा एक अल्पवयीन मुलगा तिथे आला आणि त्याने मुलांना टोटोत फिरवण्याची इच्छा व्यक्त केली. या टोटोत जितू उर्फ पाली आणि अभषेक आधीच बसले होते. सोन कॉलनीतील शिव मंदिराच्या जवळ, मासे बाजाराजवळील एका जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीत त्या तिघांनी महिलेवर जबरदस्ती करत तिचे लैंगिक शोषण केले. यादरम्यान तिच्या मुलांजवळ मोबाईल फोन देऊन त्यांना गप्प करण्यात आलं.

गँगरेपनंतर तीन्ही आरोपी पिडित महिलेला पाण्याच्या टाकीजवळ टाकून तिथून पळून निघून गेले. तिथून जाण्याआधी तिघांनी तिला शंभर रुपये दिले आणि म ग तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच, शहर पोलीस ठाणे प्रमुख बाबन बैठा यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार करण्यात आले. पथकाने छापेमारी करत तीघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पिडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना तुरुंगात पाठवले जात असून अल्पवयीन मुलाला सुरक्षित ठिकाणी पाठवले जाईल.

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

या घटनेमुळे परिसरात आता संतापाचे वातावरण असून पोलिस आरोपींवर लवकरच कायदेशीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याशिवाय महिलेची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाईल. पिडितेने पोलिसांसमोर तिघांचाही ओळख पटवली असून या प्रकरणात स्पीडी ट्रायलच्या अंतर्गत कारवाई केली जाईल. महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

Web Title: Bihar aurangabad nepali woman gangrape two accused arrested speedy trial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Rape Case

संबंधित बातम्या

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
1

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
2

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
3

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
4

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.