राजस्थानमध्ये भाजप नेत्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली
Rajasthan Crime News : राजस्थानातील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपच्या नेत्यानेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधामध्ये पत्नी अडथळा ठरत असल्यामुळे भाजप नेत्याने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला आणि मृतदेहाशेजारी बसून रडण्याचे नाटक केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला पोलिसांनी दरोड्याच्या अँगलने तपास सुरू केला होता. मात्र चौकशीत सत्य बाहेर येताच भाजप नेत्यासह त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.
हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव संजू सैनी आहे. तर भाजप नेत्याचे नाव रोहित सैनी असे आहे. रोहित सैनीने अनैतिक संबंधात पत्नीचा अडथळा येत असल्याने पत्नीलाच संपवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेता रोहित आणि त्याची गर्लफ्रेंड रितू यांची कसून चौकशी केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.
एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रोहितने घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला होता. त्याने सांगितले की, दरोडेखोर घरात घुसले, दागिने लंपास केले आणि पत्नीची हत्या करून गेले. मात्र तपासादरम्यान पोलिसांना रोहितवर संशय आला. चौकशीत तो वारंवार आपले जबाब बदलत होता. शेवटी पोलिसांनी कडकपणे धाक दाखवला असता, रोहितने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने सांगितले की, गर्लफ्रेंड रितूच्या दबावामुळेच त्याने पत्नीची हत्या केली. रितूनेच संजूला संपवण्यासाठी रोहितवर दबाव आणला होता. या खळबळजनक घटनेमुळे राजस्थानमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, किशनगडमध्ये भाजप मंडल सरचिटणीस नेते रोहित सैनी यांनी त्यांच्या प्रेयसीसोबत नियोजन करून पत्नी संजू सैनी यांची हत्या केली. रोहित आणि रितू दोघेही २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिस चौकशीत असेही समोर आले की, हत्येच्या वेळी रितू उपस्थित नव्हती परंतु नियोजनात सहभागी होती.
किशनगढमध्ये, रविवार (१० ऑगस्ट) रोजी दुपारी २:०० वाजता, भावाला राखी बांधण्यासाठी जात असताना, सिलोरा भाजप मंडल सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नीला घेरण्यात आले आणि दरोडा टाकण्यासाठी भरदिवसा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात, रोहितच्या पत्नीचा गळा आरोपींनी कापला. पोलिसांनी रुग्णालयात रोहितची वैद्यकीय चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत.