Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध, सौजन्य : सोशल मीडिया
मेरठमधील बहुचर्चित निळा ड्रम केस (Blue Drum case) प्रकरणात स्थानिक न्यायालयाने एक मोठा निकाल दिला आहे. सौरभ राजपूत हत्याकांडप्रकरणी आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना न्यायालयाने आरोपी सिद्ध केले आहे.
मेरठमधील या हत्याकांडानंतर देशभरात तो चर्चेचा विषय ठरला होता. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करत त्याचा मृतदेह चक्क मोठ्या निळ्या ड्रममध्ये सिमेंट टाकून पुरला होता. आता या प्रकरणी मेरठ कोर्टाने मुस्कान व साहिलला दोषी ठरवले असून शिक्षेची घोषणा 14 दिवसानंतर होणार आहे. त्यासाठी कोर्टाने 14 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. हा निर्णय न्यायाधिश अरविंद कुमार मिश्रा यांनी दिला.
सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपी मुस्कान आणि साहिल व्हिडीओ कॉन्फसरिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. दरम्यान, सौरभ राजपूत हत्याकांड जुलै 2025 मध्ये ट्रायल सुरू झाले होते. जवळपास 13 महिन्यांपर्यंत न्यायालयात यावर वाद विवाद पार पडले.
126 तारखांदरम्यान 22 पेक्षा जास्त साक्षिदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबाने न्यायालयाकडे दोन्ही आरोपिंना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे.
Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक
मृत सौरभ राजपूतचा भाऊ राहुलने वृत्तसंस्थेशी साधलेल्या संवादात असे सांगितले की, आम्हाला सुरुवातीपासूनच अपेक्षा होती की, आम्हाला न्याय मिळेल. आम्ही सुरुवातीपासून एकच मागणी केली आहे, ती म्हणजे यांनी जे आमच्या भावासोबत केले, तेच त्यांच्यासोबत व्हायला हवे. त्यांना कमीत कमी फाशी व्हायला हवी.
ते पुढे म्हणाले की, आम्ही जवळपास दिड वर्षांपासून न्यायासाठी लढत आहोत. भावाच्या हत्येनंतर आमचे दैनंदिन जीवन थांबले आहे. न्यायालयात सकाळी 11 वाजता पोहचणे व संध्याकाळी 5 वाजता घरी जाणे हेच आमचे काम राहिले आहे. मला व माझ्या आईला देखील साक्ष द्यायला न्यायालयात बोलावण्यात आले होते.
राहुल म्हणाले की, या प्रकरणी कमीत कमी 22 जणांची साक्ष झाली आहे. त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना सांगितले की, आम्हाला सुरुवातीपासून अपेक्षा आहे की, यांना फाशीची शिक्षा होईल. जर सत्र न्यायालयाने त्यांना कमी शिक्षा दिली, तर आम्ही उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ.
सौरभ राजपूत हत्याकांड निळ्या ड्रममुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला होता. सौरभचा मृतदेह त्याच्या घरातील एका निळ्या ड्रमच्या आत सापडला होता. मुस्कान व साहिलने सौरभची निर्घुण हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेत निळ्या ड्रमात टाकला व मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्या ड्रमात सिमेंट ओतले. त्यामुळे हे प्रकरण देशभरात खूप चर्चेत आले होते.






