Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीचे लग्न ठरताच प्रियकराचा संताप; लग्न मंडपावरच फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब अन् नंतर…

तरुणीच्या घरी येणे-जाणे वाढले. रुबीशी त्याची घट्ट मैत्री झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. त्यांच्यात मैत्री फुलत असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. रुबीच्या वडिलांनी सायमनची समजूत घातली. त्यामुळे दोघांची ताटातूट झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2026 | 09:37 AM
लग्न मंडपावर फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब

लग्न मंडपावर फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता नागपुरात एक विचित्र घटना घडली. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरले. याच रागातून आरोपी सायमन अॅब्रो (वय २३, रा. मार्टिननगर) याने लग्न मंडपाच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकला. या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमन हा तीन वर्षांपूर्वी गोदावरीनगरात राहत होता. त्यावेळी वस्तीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणी रुबी (बदललेले नाव) च्या कुटुंबीयांशी त्याची ओळख झाली. तरुणीच्या घरी येणे-जाणे वाढले. रुबीशी त्याची घट्ट मैत्री झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. त्यांच्यात मैत्री फुलत असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. रुबीच्या वडिलांनी सायमनची समजूत घातली. त्यामुळे दोघांची ताटातूट झाली. मात्र, काही महिन्यांनतर दोघांना एकमेकांचा विरह सहन झाला नाही. दोघे पुन्हा एकत्र आले. दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Beed Crime : बीड हादरवणारी घटना ! २२ तास पोटात मृत बाळ, रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप; चौकशी समिती स्थापन

दरम्यान, मुलीचे वाढते प्रेमसंबंध लक्षात आल्याने कुटुंबीयांनी घाईघाईने नातेवाईकातील तरुणासोबत तिचे लग्न ठरवले. घरच्यांनी रुबीवर लक्ष ठेवत तिला बाहेर जाण्याची संधी दिली नाही. लग्नाची तयारी पूर्ण झाली असतानाच ही माहिती सायमनपर्यंत पोहोचली. संतापलेल्या सायमनने दुचाकीने थेट रुबीचे घर गाठले. घरासमोर उभारलेला लग्नमंडप पाहताच त्याने शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लग्नघरी एकच खळबळ उडाली.

पोलिसांची तत्परता; विवाह सुरळीत

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीष कळसेकर यांनी तातडीने पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी सायमनला ताब्यात घेतले. लग्न वेळेत आणि सुरळीतच होईल, असा विश्वास वधूपित्याला पोलिसांनी दिला. दुसऱ्या दिवशी रुबीचे लग्न थाटात पार पडले. नागरिकांनी पोलिसांवर दाखवलेला विश्वास मानकापूर पोलिसांनी सार्थ ठरवला.

Uttar Pradesh crime : हादरवणारी घटना ! जुन्या प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाची तिसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या, पत्नी व पतीवर गुन्हा

Web Title: Boyfriend throws petrol bomb right at the wedding pavilion incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या
1

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
2

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
3

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
4

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.