Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

शहरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे लक्षात येताच अज्ञात इसमाने वाहनात असलेला मुद्देमाल जागीच सोडून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 08:28 AM
बारामती शहरात सव्वा दोन कोटीचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

बारामती शहरात सव्वा दोन कोटीचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती शहरात पोलिसांनी गांजाची तस्करी उघडकीस आली असून, तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. बारामती शहरातील जळोची रोड परिसरात गांजाने भरलेल्या दोन टाक्या पोलिसांना आढळून आल्या आहेत.

याबाबत अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे लक्षात येताच अज्ञात इसमाने वाहनात असलेला मुद्देमाल जागीच सोडून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी तपासणी केली असता साधारण १५०० लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रत्येकी एक किलो वजनाचे एकूण २७० पॅकेट गांजा लपवून ठेवलेला आढळून आला आहे.

या पॅकेट्सची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तस्करीसाठी पाण्याच्या टाक्यांचा वापर करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला.

ही कारवाई बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या आढळून आलेला गांजा जप्त करण्यात आला असून, गांजाचा साठा नेमका कुठून आणण्यात आला व तो कुठे नेण्यात येणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बारामती शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपुरातही पोलिसांची मोठी कारवाई

दुसऱ्या एका घटनेत, नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने मोठी कारवाई करीत हावडा-मुंबई एक्स्प्रेसने आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करून तब्बल ६०.७५० किलो गांजा जप्त केला. गांजाचे बाजार मूल्य ३० लाख ३७ हजार ५०० रुपये आहे. चंदेश्वर पासवान (४१) आणि विक्की कुमार (वय १९ दोन्ही रा. बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

Web Title: Cannabis worth two and a half crores seized in baramati city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • baramati news
  • cannabis seized

संबंधित बातम्या

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
1

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
2

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
3

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
4

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.