Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

चंद्रपुरात 22 वर्षीय तरुणाने लिव्ह-इन पार्टनरचा चार्जर वायरने गळा आवळून खून केला. आत्महत्येचा बनाव केला, पण 20 दिवसांनी शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आले आणि आरोपी अटकेत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 12:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लिव्ह-इन पार्टनरचा गळा आवळून खून
  • आत्महत्येचा बनाव, शवविच्छेदनातून उघड
  • आरोपी अटकेत, पुढील तपास सुरू
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Raigad Crime: एका भीतीने घेतला जीव! घरच्यांनी फेसबुकवरच्या मित्राशी बोलतांना पकडले आणि… १५ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव अंकेश योगेश बहिरवार (वय २२ वर्ष) रा. सोनापूर, तहसील सावली अशी पटली आहे. तर मयत महिला प्रियांका (वय २९ वर्षे) ही तुकूम येथील रहिवासी होती. प्रियांका ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती आणि याच काळात तिची भेट स्वतःपेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघेही दुर्गापूर येथील प्रियांकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होऊ लागले होते. प्रियांका अंकेशवर काही गोष्टींसाठी दबाव टाकत असे आणि त्याला त्याच्या कुटुंबाशी संवाद साधण्यापासून रोखत होती, ज्यातून त्यांच्यातील तणाव वाढत गेला आणि अखेर त्याचे रूपांतर हत्येत झाले.

कसे उघडले हत्येचे गुपित

या हत्येचा भीषण घटनाक्रम १४मार्चच्या रात्री सुरु झाला, तेव्हा अंकेशने वादाच्या भरात प्रियांकाचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने संतापाच्या भरात घरातील मोबाईल चार्जरच्या वायरचा वापर करून तिचा गळा आवळला आणि तिचा मृत्यू झाल्याची खात्री केली. त्यांनतर घाबरलेल्या अंकेशने मध्यरात्री प्रियांकाच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की प्रियांका काही बोलत नाहीये, ती अचानक बेशुद्ध झाली आहे. तिने कदाचित आत्महत्या केली असावी. हे ऐकताच वडिलांनी आणि कुटुंबीयांनी तातडीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यांना प्रियांका निपचित पडलेली दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला गळ्यावरील व्रण पाहून हा आत्महत्येचा प्रकार वाटत होता, त्यामुळे पोलिसांनी देखील अपघाती मृत्यूची प्राथमिक नोंद केली होती.

गुरुवारी प्रियांकाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आला तेव्हा हत्येचे भीषण सत्य समोर आले. या अहवालात प्रियांकाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. ज्यामुळे आत्महत्येचा बनाव पूर्णपणे उघड पडला. पोलिसांनी त्वरित अंकेशला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

Nashik Crime: सोशल मीडियावरून वाद; पतीने पत्नीला गाडीतून फेकून दिलं, नंतर पत्नीवर कार चढवून…

पोलीस या घटनेचा सखोल तपस करत असून हत्येसाठी वापरलेली मोबाईल चार्जरची वायर आणि एक्सटेंशन बोर्ड जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशी उघड झाली?

    Ans: शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्याने हत्या उघड झाली.

  • Que: आरोपीने काय प्रयत्न केला होता?

    Ans: खून आत्महत्येसारखा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

  • Que: आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपीला अटक करून पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Chandrapur crime sensational murder in chandrapur 22 year old man kills girlfriend initially staged it as a suicide but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.