crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
राजस्थान पोलिसांच्या अजमेर एटीएस टीमने भिलवाडा येथे एका हायटेक फसवणुकीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी तरुण हे केमिकलचा वापर करून ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा बनवण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालत होते. याप्रकरणी एटीएसने शनिवारी रात्री उशिरा कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 500−500 रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कागदाचे तीन बंडल जप्त करण्यात आले आहेत. सुभाषनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एटीएसच्या एएसआयच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
कशी केली कारवाई?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेर एटीएस टीमचे एएसआय मोहम्मद रफीक यांनी सुभाषनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, काही लोक अजमेरच्या आसपासच्या परिसरात असली रुपयांच्या रंगासारख्या कागदाचे 500 रुपयांच्या नोटेच्या आकाराचे रिकामे कागद एकत्र करून, ते असली असल्याचे भासवत होते आणि लोकांची फसवणूक करत होते. या माहितीच्या आधारावर त्यांना पकडण्यासाठी एटीएसने एक योजना आखली.
त्यांनी या ठगांच्या मोबाईलवर फोन करून आपण अजमेरचे हाजी बाबा असल्याचे सांगितले आणि स्वतःची एक कार विकण्याची खोटी गोष्ट रचली. ठगांनी त्यांना भीलवाडा शहराच्या अहिंसा सर्कलवर बोलावले. एएसआय रफीक यांनी एटीएसच्या पोलीस पथकासह शनिवारी रात्री अहिंसा सर्कलवर धाव घेतली. सर्कलवर त्यांना असलम, इंसाफ आणि रियाज नावाचे तीन युवक भेटले. येथे रफीक यांनी आपली कार 7 लाख रुपयांना विकण्याचा सौदा निश्चित केला.
कसा बदलला काळा कागद 500 रुपयांत?
सौदा निश्चित झाल्यानंतर इंसाफ नावाच्या युवकाने काळ्या रंगाच्या कागदाच्या गड्डीतून एक काळा कागद काढला आणि जवळच ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात असलेल्या पांढऱ्या पावडरच्या पाण्यात तो कागद धुतला. त्यानंतर तो काळा कागद अचानक 500 रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटेत बदलला. या पद्धतीने इंसाफने त्याच्या बॅगेतील कागदाच्या गड्डीतून 12 नोटा धुवून 500 रुपयांच्या नोटांमध्ये रूपांतरित केल्या.
दारु पिण्याच्या कारणावरुन वाद, जाब विचारायला दोघे घरी गेले अन् पुढे घडलं भयानक
तातडीने कारवाई
एटीएस टीमने तातडीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी इतर लोकांशीही अशाच प्रकारे फसवणूक करण्याची योजना आखल्याची कबुली दिली. एटीएस टीमने तिन्ही ठगांकडून 500 च्या नोटा बनवण्याचे कागदाचे तीन बंडल, प्लॅस्टिकच्या एका डब्यात पांढरी पावडर, 500 रुपयांच्या 13 भारतीय चलनाच्या नोटा आणि एक मोटारसायकल देखील जप्त केली आहे. पोलीस या ठगांची अधिक कसून चौकशी करत आहेत.