
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली; हाणामारीत आरोपीचा मृत्यू
वैष्णवीला रक्ताच्या उलट्या…
वैष्णवीच्या वडिलांची दहेगाव-बिडकीन मार्गावर पानटपरी आहे. त्यांचे नाव संतोष यादवराव नीळ असे आहे. वैष्णवी दुपारी १२ वाजता महाविद्यालयातून घरी आली. त्यावेळी तिचे वडिल पानटपरी चालविण्यासाठी गेले होते, तर आई मथुरा ही शेतात कमला गेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रितेश हा सकाळी शाळेत गेला होता. ती घरात एकटीच होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास संतोष यांना वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. संतोष यांनी वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे पत्नी मथुराला सांगितले. तेव्हा मथुरा आणि नातेवाईकांनी घरी धाव घेतली. तेव्हा त्यांना वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तात्काळ बाहेर ओसरीत आणले तेव्हा पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वाळूज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाळूज पोलिसांनी घटनास्थळी श्वान व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह रुग्णालयात हलविला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. ती घरात एकटी असतांना तिच्या सोबत काय घडलं? आरोपी कोण? हत्या का करण्यात आली? अशे अनेक प्रश्नांचा उत्तर पोलीस शोधत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार! मालक गंभीर जखमी आणि हल्ल्लेखोर फरार
Ans: गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे शुक्रवारी (ता. १९) दुपारी ही घटना उघडकीस आली.
Ans: वैष्णवी संतोष नीळ (वय १८), वाळूज येथील महाविद्यालयात १२ वीची विद्यार्थिनी.
Ans: अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक, श्वान पथकासह तपास सुरू आहे.