प्रसिद्ध हॉटेलमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार (Photo Credit- X)
नेमकी घटना काय?
पीडित महिला शहरातील एका नामांकित रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. १७ डिसेंबर रोजी रात्री पैशांच्या कामासाठी ती तिचा मित्र संतोष शिंदे याला भेटण्यासाठी ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली होती. दोघे रूम क्रमांक १०५ मध्ये थांबले होते.
चुकीचा दरवाजा ठोठावला आणि घात झाला
मद्यप्राशन केलेले असल्याने पीडिता काहीशी नशेत होती. रात्री ११ च्या सुमारास फोनवर बोलण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली. मात्र, परत जाताना तिने चुकून १०५ ऐवजी शेजारील रूम क्रमांक २०५ चा दरवाजा ठोठावला.
नराधमांनी साधली संधी
त्या खोलीत किरण राठोड, घनश्याम राठोड आणि ऋषिकेश चव्हाण हे तिघे मद्यप्राशन करत बसले होते. आपण चुकीच्या खोलीत आलोय हे लक्षात येताच पीडिता बाहेर पडू लागली, मात्र आरोपींनी “तुझा मित्र इथेच आहे” असे खोटे सांगून तिला आत बोलावले. तिथे तिला पुन्हा दारू पाजून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई
१८ डिसेंबर रोजी पहाटे मद्याचा अंमल ओसरल्यावर पीडितेला आपल्यासोबत घडलेला प्रकार समजला. तिने हिंमत दाखवून थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पीडितेला आरोपींची नावे माहित नव्हती. मात्र, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आरोपीचा माग काढला. त्यानंतर काही वेळातच तिन्ही नराधमांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. घनश्याम भाऊलाल राठोड (२७, रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी)
२. किरण लक्ष्मण राठोड (२६, रा. भानुदासनगर)
३. ऋषीकेश तुळशीराम चव्हाण (२५, रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी)






