Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई

पुणे शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे १९ जणांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्वांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रशिक्षण घेत असलेल्या नऊ जणांनाही तातडीने परत बोलावण्यात आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 03:29 PM
Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई

Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांवर पुणे पोलीस दलात १९ जणांची भरती
  • १९ जणांवर बडतर्फीची कारवाई; प्रशिक्षणातील नऊ जणांना परत बोलावले
  • कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह चौघांना अटक; १९ संघटनांची चौकशी

पुणे: राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत पुणे शहर पोलीस दलात भरती झालेल्या १९ उमेदवारांनी ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व १९ उमेदवारांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून, बनावट प्रमाणपत्रांचे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

प्रशिक्षण घेत असलेल्या नऊ जणांनाही परत बोलावले

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे भरती झालेल्या १९ उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून घेण्यात आले नव्हते. तर उर्वरित नऊ जणांना विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर या नऊ जणांनाही तातडीने प्रशिक्षण केंद्रातून परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सजग नागरिकाच्या माहितीने बोगसगिरीचा पर्दाफाश

पुणे शहर पोलीस दलाच्या २०२४-२६ मधील भरती प्रक्रियेदरम्यान कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांची बनावट प्रमाणपत्रे वापरून १९ उमेदवार भरती झाल्याची गुप्त माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली. त्याने संबंधित पुरावेही पोलिसांकडे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.

हेही वाचा: Crime News: ‘पोलिस अधिकारी आहे’ म्हणत धमकी; ऑनलाइन गेममधील मैत्रीचा इंजिनिअरला बसला फटका

दहा वर्षे स्पर्धाच नाहीत, तरी कागदोपत्री आयोजन

पोलिसांच्या तपासात २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष कोणत्याही स्पर्धा आयोजित न करताच त्या झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर याच बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह चौघांना अटक

या प्रकरणाचा अधिक तपास करत गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. याच केंद्रांवर बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?

१९ संघटनांची माहिती पोलिसांच्या हाती

या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे तपासातून समोर येत आहे. कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटनांची माहिती गुन्हे शाखेने संकलित केली आहे. या संघटना चालवणाऱ्या संशयित पदाधिकाऱ्यांचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करून पोलीस भरती मिळवण्याच्या या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावरही लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे पोलीस भरतीत किती उमेदवारांवर कारवाई होणार आहे?

    Ans: कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे भरती झालेल्या १९ उमेदवारांवर कारवाई होणार आहे

  • Que: या उमेदवारांनी कोणत्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला?

    Ans: राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

  • Que: प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांचे काय होणार?

    Ans: प्रशिक्षण केंद्रांमध्ये असलेल्या नऊ उमेदवारांना तातडीने परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Pune police recruitment scam fake kurash certificates 19 dismissal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Crime in Pune
  • Pune Police News

संबंधित बातम्या

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात
1

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
2

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या
3

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
4

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.