Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाखांची रोकड लंपास; चोरटे CCTV मध्ये कैद

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॉटिंग व्यावसायिक फैसल खान यांच्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडून चोरट्यांनी 20 लाख रुपयांची रोकड लंपास केली. बँकेत 10 लाख भरल्यानंतर उर्वरित रक्कम गाडीत ठेवण्यात आली होती. सायरन वाजल्यानंतर प्रकार उघड झाला असून पोलिसांकडून CCTVच्या आधारे तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फॉर्च्युनरची काच फोडून चोरट्यांनी 20 लाखांची रोकड पळवली.
  • व्यावसायिक बँकेत RTGS फॉर्म भरण्यासाठी गेले असताना चोरी झाली.
  • स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडून तब्बल 20 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना 11 जून रोजी बीड बायपास रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर घडली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime)

भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

कशी केली चोरी?

मिळालेल्या माहितीनुसार, फैसल खान हे प्लॉटिंग व्यवसाय करतात. व्यवहारातून आलेली मोठी रोकड बँकेत भरण्यासाठी ते आपल्या नातेवाईकांसोबत फॉर्च्युनर गाडीतून आले होते. त्यांच्याकडे एकूण 30 लाख रुपये होते. यापैकी 10 लाख रुपये त्यांनी बँकेत भरले. मात्र उर्वरित 20 लाख रुपये गाडीतच ठेवले होते.(Chhatrapati Sambhajinagar Crime)

दरम्यान, फैसल खान आणि त्यांचे नातेवाईक बँकेत आरटीजीएस फॉर्म भरण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या गाडीवर पाळत ठेवली. गाडीत कोणी नसल्याची खात्री होताच दोन चोरटे स्पोर्ट्स बाईकवरून आले आणि त्यांनी फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. गाडीची काच फुटताच सुरक्षा यंत्रणेअंतर्गत असलेला सायरन वाजू लागला. सायरनचा आवाज ऐकून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने बाहेर येत कोणाची गाडी आहे, असा आवाज दिला. त्यानंतर फैसल खान तातडीने बाहेर आले. मात्र, तोपर्यंत चोरटे रोकड घेऊन पसार झाले होते.

या घटनेमुळे फैसल खान यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चोरट्यांना गाडीत मोठी रोकड असल्याची माहिती कशी मिळाली? त्यांनी आधीपासूनच पाळत ठेवली होती का? याचाही तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

अन्न भासळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरीची घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर ही घटना घडली.

  • Que: गाडीत किती रोकड ठेवली होती?

    Ans: व्यावसायिकाने गाडीत 20 लाख रुपये ठेवले होते.

  • Que: पोलिसांकडून कोणता तपास सुरू आहे?

    Ans: पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पोर्ट्स बाईकवरील संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime fortuner window smashed 20 lakh cash stolen thieves caught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं
1

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल
3

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू
4

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.