Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘भाजीत केस’ कारण ठरलं जीवावर! रात्रभर निर्दयी मारहाण, 25 वर्षीय महिलेने संपवले आयुष्य

छत्रपती संभाजीनगरात पतीच्या मारहाण व छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. तर केजमध्ये छळामुळे 16 वर्षीय मुलीने गळफास घेतला. दोन्ही घटनांनी संताप व्यक्त होत असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 10:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीकडून मारहाण, हुंड्याची मागणी व मानसिक छळ
  • 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह 7 जण अटकेत
  • केजमध्ये छळाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवतांना भाजीत केस निघाला म्हणून निर्दयी पतीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर पती आणि सासरच्याछळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. ईश्वरी बनकर (वय २५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

२ लाख रुपये हुंडा

अजय बनकर असे निर्दयी पतीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न २०२० मध्ये मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. सासरच्यांना सोने-नाणे, २ लाख रुपये हुंडा आणि सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही पती अजय हा वारंवार माहेरहून पैशांची मागणी करण्यासाठी तिला मारहाण करत असे. दारूच्या नशेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.

Nashik Crime: खाकी वर्दीचा बनाव, AI चा वापर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची फसवणूक; आरोपी गजाआड

सात जणांना अटक

विशेष म्हणजे अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे. ईश्वरीच्या आत्महत्यानंतर कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात ठिय्या धरला होता. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. छावणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पती अजय बनकर याच्यासह सासरच्या सात जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ; दर्ग्यात घेवून गेले अन्….

संभाजीनगर शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली विवाहित तरुणीवर अमानुष छळ झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आधारकार्ड काढण्याच्या बहाण्याने पती, सासू व दीराने तिला दर्यात नेले. तेथे भुतबाधा झाल्याचे सांगत तिच्यावर मारहाण करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढून नातेवाईकांना पाठवण्यात आला. ही घटना २८ मार्च रोजी सायंकाळी मिसारवाडी परिसरात घडली. या प्रकरणी दीर शेख हारुन शेख फकीर मोहम्मद व भोंदू बाबा अश्पाक उर्फ अशोक जाधव या दोघांना अटक करण्यात आली असून ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. पती शेख इरफान व सासू जकिरा शेख हे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहितेने आत्महत्या का केली?

    Ans: पती व सासरकडून होणाऱ्या मारहाण, हुंड्याच्या मागणी आणि मानसिक छळामुळे.

  • Que: या प्रकरणात कोणावर कारवाई झाली?

    Ans: पती अजय बनकर आणि सासरच्या सात जणांना अटक करण्यात आली.

  • Que: दुसऱ्या घटनेत काय घडलं?

    Ans: केजमध्ये छळामुळे 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime hair in the curry proves fatal subjected to brutal beating all night 25 year old woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा
1

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
2

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
3

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
4

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.