Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

छत्रपती संभाजीनगरात NEETची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्षे लिव्ह-इनमध्ये ठेवत अत्याचार करण्यात आले. दागिने विकून पैसे घेतल्यानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला; गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 12:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आश्वासन देऊन 3 वर्षे लिव्ह-इनमध्ये अत्याचार
  • तरुणीकडून दागिने विकून सुमारे 80 हजार रुपये घेतले
  • शेवटी लग्नाला नकार; आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवर ३ वर्षीय अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला कधीच सोडून जाणार नाही, असं सांगत तिच्यासोबत जवळीक वाढवली. 3 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून वारंवार अत्याचार केला. शेवटी मेसेज पाठवून लग्नाला नकार दिला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील आहे.

Hingoli Crime: जनदात्या आईनेच दिली सुपारी! पाहुण्यांकडे जायचं आहे सांगत नेले आणि…; हिंगोलीतील घटना

काय घडलं नेमकं?

वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. या प्रकरणी मूळचा बीडमधील कोल्हे होडचा जयदत्त जगन्नाथ चोरगे याच्याविरुद्ध जव्हारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी जालना जिल्ह्यातील असून ती शिक्षणासाठी शहरात राहत होती. जून 2023 मध्ये तिची 24 वर्षीय आरोपीशी ओळख झाली. त्याने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. 28 जून 2023 रोजी मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. त्यांनतर १ मार्च 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत दोघे शिवाजीनगर आणि बीड बायपास परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. या काळात आरोपी चोरगे हा इतर मुलींसोबत संपर्कात असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर त्याने तिला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दागिने विकून पैसे दिले तरीही…

जानेवारी २०२६ मध्ये आरोपीला एम.कॉम.च्या प्रवेशासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने स्वतःचे दागिने विकून सुमारे 80 हजार रुपये त्याला दिले. पुढे 14 फेब्रुवारी 2026 रोजी शहागड येथे दोन्ही कुटुंबांची बैठक झाली; मात्र आरोपीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. तरीही आरोपीने लग्न करणार असल्याचे आश्वासन देत तिला विश्वासात ठेवले, असा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या पत्नीची हत्या, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार; कारण काय?

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर घटस्फोटित पत्नीचा तिच्याच दुसऱ्या पतीकडून चाकूने हत्या केल्याचे समोर आले आहे. पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु, करमाड) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिली. अखेरीस पोलिसांनी तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

Beed Crime: चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीने उचलले टोकाचे पाऊल; आरोपी ताब्यात

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने तरुणीला कसे फसवले?

    Ans: लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन करून लिव्ह-इनमध्ये ठेवले

  • Que: तरुणीने पैसे कसे दिले?

    Ans: स्वतःचे दागिने विकून सुमारे 80 हजार रुपये दिले.

  • Que: शेवटी काय घडले?

    Ans: आरोपीने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime lured with a promise of marriage lived together for 3 years sold jewelry to provide money only to face a refusal to marry in the endwhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.