काय घडलं नेमकं?
८ एप्रिल रोजी जामदया ते खिल्लार रस्त्यावर एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरु केला. मृताची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह सचिन रामकिशन राजगुरू (रा. वढव, ता. लोणार, जि. बुलढाणा) याचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Beed Crime: चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीने उचलले टोकाचे पाऊल; आरोपी ताब्यात
कशी केली हत्या?
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलीस लोणार तालुक्यातील वढव गावात पोहोचले. रामदास विश्राम तनपुरे (वय ६५) याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याची सखोल तपस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चौकशीत तनपुरे याचे सचिनच्या आई लीलाबाई हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने लीलाबाईने त्याला संपवण्याचा कट रचला. तिच्या सांगण्यावरून तनपुरे याने नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.आरोपींनी सचिनला “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून आपल्या सोबत नेले. त्यानंतर साखरा परिससरात त्याला मद्य पाजण्यात आले. त्यानंतर जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपी अटकेत
मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. लीलाबाई, रामदास तनपुरे आणि नरेश पवार असे तिघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरोधात पुढील कारवाई पोलीस करत असून या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद
हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनाच बनावट पोलीस बनून गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली.
ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
Ans: अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने.
Ans: मृत युवकाची आई, तिचा साथीदार आणि सुपारी घेणारा आरोपी.
Ans: 48 तासांत गुन्हा उघड करून तिन्ही आरोपींना अटक केली.






