
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
विजय लक्ष्मण भांडेकर (वय 40) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विजय भांडेकर हे मजुरीचे काम करतात. गेल्या चार महिन्यांपसून त्यांच्या घरी बहीण गीता लक्ष्मण पवार ही देखील राहत आहे. 6 जून रोजी विजय भांडेकर हे कामावरून घरी आले. तेव्हा त्यांनी बहीण गीता हिला जेवण वाढण्यास सांगितले. तेव्हा गीता यांनी भावाला शिळी भाजी वाढली. यावरून “मला ही भाजी नको, दुसरी बनवून दे,” असे म्हंटले. यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. बहिणीने “किती दिवस तुझेच ऐकत बसू?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर विजयने बहिणीला “तू येथे राहू नको, तू तुझ्या घरी जा,” असे म्हंटले. त्यामुळे बहिणीने फोन करून मुलगा माधव पवार याला बोलावून घेतले.
Vasai Crime: हॉटेलमधून घरी जात असताना महिलेचा पाठलाग, इमारतीतच केला विनयभंग आणि…; संतापजनक!
गीता ने फोन करताच तिचा मुलगा माधव हा मामाच्या घरी आला. तेव्हा तिनं विजय शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे सांगितले. यावर माधव याने मामाला शिवीगाळ सुरू केली. गीता हिने भावाला पकडलं, तर भाच्याने मामावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये मामा विजय भांडेकर गंभीर जखमी झाला. तातडीने विजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी गीता आणि माधव पवार यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चुलतभावाची हत्या करून बेपत्ता असल्याची तक्रार; ‘तो जिवंत आहे’ भासवण्यासाठी मेसेज आणि…
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या चुलत भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी भावाने आधी चुलतभाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्याने तो जिवंत आहे भासवण्यासाठी मृतकाच्या फोनमधून कुटुंबियांना मेसेज केले. त्या मेसेजमधून पैशांची मागणी केली. मात्र एके दिवशी आरोपीच्या फोनची आणि चुलत भावाची लोकेशन एकच दिसली आणि आरोपी पकडला गेला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून तपास सुरु आहे.
प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव
Ans: शिळ्या भाजीवरून झालेल्या वादातून भाच्याने मामावर धारदार हत्याराने हल्ला केला.
Ans: विजय लक्ष्मण भांडेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: गीता पवार आणि तिचा मुलगा माधव पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.