Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात 20 वर्षीय नंदिनी धिवरे हिचा मृतदेह रिक्षात आढळला. ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीतून आईने प्लास्टिक पाईपने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 08:19 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाळूज एमआयडीसीतील तिसगाव चौफुली येथे तरुणीचा मृतदेह सापडला
  • आईनेच प्लास्टिक पाईपने गळा आवळून केली हत्या
  • मृतदेह गादीत गुंडाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे घडली. एका रिक्षात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मात्र जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या का केली? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे (वय २०) असे आहे. तर आरोपी आईचे नाव भरती उमेश साबळे (वय ३५) असे आहे. तर सावत्र वडील उमेश गोविंद साबळे(वय 40, रा. वडगाव कोल्हाटी) पोलिसांनी यांना ताब्यात घेतले आहे. मृत नंदिनीने काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचा संसार सुरळीत सुरु असला तरी दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिले. त्यानंतर ती माहेरी परतली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

लोक काय बोलतील?

यानंतर तिचे दुसऱ्या एका तरुणाशी संबंध जुळले. हे तिच्या आईला आणि सावत्र वडिलांना समजताच घरात वारंवार वाद होत होते. ‘समाजात बदनामी होईल, लोक काय बोलतील?’ या भीतीने आई संतप्त होती. सुमारे वीस दिवसांपूर्वी आई-मुलगी वडगाव कोल्हाटी येथे राहायला आल्या होत्या. घटनेच्या दिवशी दुपारी अंदाजे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून नंदिनीची हत्या केली. त्यांनतर मृतदेह गाडीत गुंडाळण्यात आला. रात्री सुमारे 10.40 वाजता संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला नंदिनीचा मृतदेह आढळला.तपासात मृतदेह कन्नड घाट परिसरात नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दोघांना अटक

वडगाव कोल्हाटी येथील काही शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून नेहमी भांडणांचे आवाज येत असत; मात्र परिस्थिती इतकी टोकाला जाईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. आई भारती साबळे हिने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या घडली त्या वेळी सावत्र वडील उमेश साबळे घराबाहेर असल्याचे सांगितले जात असले, तरी नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून आता आणखी काही समोर येते का याचा देखील तपास करत आहे.

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे रिक्षात.

  • Que: हत्येमागील कारण काय?

    Ans: मुलीच्या नातेसंबंधांमुळे घरात वाद होत होते; ‘समाजात बदनामी होईल’ या भीतीतून गुन्हा केल्याचे तपासात समोर आले.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime what will people say mother kills 20 year old girl out of fear what exactly is the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
4

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.