Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: घरात घुसून महिलेने पिस्तूल आणि चाकूने केली महिलेची हत्या; काय घडलं नेमकं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने घरात घुसून पिस्तूल व चाकूच्या साहाय्याने दुसऱ्या महिलेची हत्या केली. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात घुसून पिस्तूल-चाकूने महिलेची निर्घृण हत्या
  • सासूबाईंनी पिस्तूल हिसकावले तरी आरोपीने चाकूने वार केले
  • वैयक्तिक वादातून हल्ला; आरोपी महिला अटकेत
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनेच महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. पिस्तूलच्या साहाय्याने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai Crime: मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत

काय घडलं नेमकं?

आरोपी महिलेचे नाव शैलजा सोनार असे आहे. या सकाळच्या सुमारास साधना सोनपेठकर यांच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी घरात साधना आणि त्यांची सासू उपस्थित होत्या. शैलजाने घरात प्रवेश करताच आतून कडी लावून घेतली आणि सोबत आणलेल्या पिस्तुलाने साधना यांच्या कपाळावर रोख धरला. मात्र प्रसंगावधान राखत सासूबाईंनी धाडसाने पिस्तूल हिसकावून घेत ते खिडकीतून खाली फेकून दिले. या गोंधळात साधना आपल्या जीव वाचवण्यासाठी घरातील बेडरूममध्ये पळाल्या.

याने शैलजा संतापली, तिने सासूबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सासूबाईंना वाचवण्यासाठी साधना पुन्हा हॉलमध्ये आल्या असता, शैलजाने त्यांच्यावर सपसप वार केले. या भीषण हल्ल्यात साधना सोनपेठकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होता. हे पाहून नागरिक हादरले.
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी महिलेला रंगेहात ताब्यात घेतले.

झटापटीदरम्यान आरोपी शैलजा सोनार किरकोळ जखमी झाल्या असून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले असून इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत साधना सोनपेठकर यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैलजा सोनार यांच्यात संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Crime: नालासोपारा-विरार हादरले! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या

सूडातून केली हत्या

यापूर्वी शैलजाने महेंद्र सोनपेठकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला सूडातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीकडून अधिक चौकशी करून नेमकी पार्श्वभूमी आणि हत्येचे कारण उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील साई श्रद्धा पार्क परिसरात.

  • Que: हल्ला कसा झाला?

    Ans: आरोपीने घरात घुसून पिस्तूल रोखले, नंतर चाकूने वार करून महिलेची हत्या केली.

  • Que: हत्येमागील कारण काय असू शकते?

    Ans: वैयक्तिक वाद आणि संबंधांमधील तणावातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime woman breaks into house and murders another woman using a pistol and a knife what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.