
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मृतक संजय दुधे यांना पाणी पिणे व शेतीसाठी पाणी उपसण्याच्या कारणावरून लहान भाऊ, वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांनी मारहाण केली. आरोपींनी यापूर्वीही दोन वेळा संजय दुधे यांना मारहाण केली होती. “तुझ्या नावावरील अर्धा एकर जमीन माझ्या नावावर करून दे,” अशी मागणी करत सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
Beed Crime: शेतातील पाणीवाटपाच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाची हत्या; मुख्य आरोपीला जन्मठेप
शेतात गेल्यावर मारहाण
14 जानेवारीला संजय दुधे हे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते. सामायिक विहिरीतील मोटार बाहेर काढत होते. यावरून पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक वळणावर गेले. लहान भाऊ, वहिनी आणि दोन्ही मुलांनी मिळून लाठ्याकाठ्यांनी संजय दुधे यांना बेदम मारहाण केली. या अपमानास्पद वागणूक आणि सततच्या त्रासाला कंटाळून अपमानामुळे संजय दुधे यांनी अखेर गळफास घेत आत्महत्या केली. असा गंभीर आरोप संजय दुधे यांच्या पत्नी रेखा दुधे यांनी केला आहे.
गुन्हा नोंद
या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री 9.15 वाजता पोलिसांनी लहान भाऊ राजू तान्हाजी दुधे (वय 59), भावजय लता राजू दुधे (वय 43), पुतणे संदीप राजू दुधे (वय 19) आणि दीपक राजू दुधे (वय 17, सर्व रा. यशवंतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी राजू दुधे आणि दीपक दुधे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. गुरुवारी रात्री 9.30 वाजता शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथे संजय दुधे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Ans: सिल्लोड तालुक्यातील यशवंतनगर येथे.
Ans: पाण्याचा वाद, मारहाण आणि जमिनीची मागणी.
Ans: चार जणांविरोधात गुन्हा; दोघांना अटक.