काय घडलं नेमकं?
मनीषच्या मित्रांनी पॅरामाऊंट सोसायटीच्या ओक टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी त्यांनी जोरदार पार्टी केली. त्या नंतर ते रूममध्ये झोपी गेले होते. सकाळी सोसायटीतील काही लोकांनी एका तरुणाला बाल्कनीत निपचित पडलेलं पाहिलं. आधी लोकांना समजलं नाही. मात्र जेव्हा सोसायटीतील लोकांनी जाऊन पाहिलं तेव्हा या तरुणाचा मृतदेह आढळून आला. उपस्थित लोकांनी तुरंत 112 क्रमांक फिरवून पोलिसांना सूचना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतले पोस्टमार्टमला पाठवला. त्यांनतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंचना केला. प्राथिकदृष्ट्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही आत्महत्या आहे की धक्काबुक्कीत पडला की एखादी गुन्हेगारी घटना आहे, पार्टीवेळी दारू व्यतिरिक्त अन्य काही नशा केला होता का? तसेच हा तरुण मानसिक तणावात होता का? याचा तपास पोलीस घेत आहे. मनीषजवळ सुसाईड नोटही सापडलेली नाहीये.
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची आणि फ्लॅटमध्ये थांबलेल्या त्याच्या मित्रांची कसून तपास केली. त्यांनी कोणताही प्रकारचा आवाज किंवा झगडा कानावर आला नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून फ्लॅट सील केला आहे.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Ans: मनीष, वय 20, निजामपूर (सिकंदराबाद) येथील रहिवासी.
Ans: बाल्कनीतून पडल्याचा संशय; आत्महत्या/अपघात/हत्या तपासाधीन.
Ans: पोस्टमार्टम रिपोर्टनंतर निष्कर्ष; मित्रांची चौकशी सुरू.






