Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: इंस्टाग्रामवर ओळख, कैफमध्ये भेटायला बोलावलं, अत्याचार केले आणि…

इंस्टाग्राम वर मुलीची एका तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने तिला प्रेमसंबंध असल्याचे भासवले. एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला खासगी छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप.
  • इन्स्टाग्रामवरील ओळखीतून आरोपीने विश्वास संपादन केल्याची तक्रार.
  • फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडल्याचे समोर आले आहे. इंस्टाग्राम वर मुलीची एका तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने तिला प्रेमसंबंध असल्याचे भासवले. एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला खासगी छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

नेमकं काय घडलं अल्पवयीन मुलीसोबत?

या प्रकरणातील आरोपीचे नाव विशाल महेंद्र तुपे (रा. शताब्दीनगर) असे आहे. या प्रकरणातील पीडित मुलीची ओळख विशाल तुपे सोबत २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर झाली. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध असल्याचे भासवत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. २९ मार्च २०२५ रोजी आरोपीने तिला टीव्ही सेंटर परिसरातील एका लॉजवर नेले आणि तिथे तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप आहे.

त्यांनतर 5 मार्च 2026 रोजी आरोपीने तिला औरंगपुऱ्यात कॉफी पिण्याच्या बहाण्याने बोलावले. एका बंद कॅफेमध्ये नेऊन तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनाम करण्याची धमकी देत आरोपीने पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धमकीच्या आधारे त्याने शहरातील विविध कॅफेमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार आरोपीने पीडितेला सिडकोतील जळगाव रोडलगत असलेल्या ‘टायटॅनिक जहाज कॅफे’ तसेच कॅनॉट परिसरातील ‘सपना मेमोज कॅफे’ येथे अनेकदा नेले. या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातला अन् नंतर…

माझे वडील सर्व पाहून घेतील…

पीडितेने विरोध केल्यानंतर 10 मे 2026 रोजी आरोपीने तिला पुन्हा ‘टायटॅनिक जहाज कॅफे’जवळ बोलावले. तेथे तिची मारहाण करून ‘माझे वडील सर्व पाहून घेतील, तुला जे करायचे ते कर,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेली घटना सांगितले.

गुन्हा दाखल

कुटुंबियांसह पीडितेने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विशाल महेंद्र तुपे याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हा नोंद होताच तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी 29 कॅफेवर टाकल्या होत्या धाडी

2024-25 मध्ये पोलिस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करत शहरातील 29 कॅफेवर धाडी टाकल्या होत्या. या वेळी बेकायदेशीर केबिन्स आणि कंपार्टमेंट्स हटविण्यात आले होते. काही ठिकाणी वापरलेले कंडोम व अन्य साहित्यही आढळून आले होते. मात्र, कारवाईनंतरही काही कॅफेंमध्ये अशा सुविधा पुन्हा सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीचे वय किती आहे?

    Ans: पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे.

  • Que: आरोपी आणि पीडितेची ओळख कशी झाली?

    Ans: दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणती कारवाई केली?

    Ans: सिडको पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar instagrammer recognition caf madhya bolavalam atrocities on bananas and chhatrapati sambhajinagar chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
2

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.