Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

छत्रपती संभाजीनगरातील कुख्यात डॉन बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेने तब्बल 21 तास छापा टाकला. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड, 21 लाखांचे सोने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, 500 काडतुसे आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली. जप्त रोकड बेहिशेबी असल्याचा संशय असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बाबा फरजानच्या बंगल्यावर 21 तास चाललेल्या धाडीत सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त.
  • कारवाईत 21 लाखांचे सोने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, 500 काडतुसे आणि इतर हत्यारेही सापडली.
  • जप्त रक्कम बेहिशेबी असल्याचा संशय असून पैशांचा स्रोत आणि संबंधित नेटवर्कचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेने केलेल्या एका गुप्त कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 90 च्या दशकात दहशत माजवणारा कुख्यात डॉन बाबा फरजान यांच्या बंगल्यावर टाकलेल्या तब्बल 21 तासांच्या धाडीत पोलिसांच्या हाती सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड, 21 लाखांचे सोने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, 500 काडतुसे आणि इतर हत्यारांचा मोठा साठा लागला आहे. विशेष म्हणजे, डॉनच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरात झालेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण नेटवर्कचा सखोल तपास सुरू आहे.

Mira-Bhayandar crime: मिरा रोडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; महिला दलाल अटकेत, दोन पीडित तरुणींची सुटका

काय नेमकं प्रकरण?

90 च्या दशकात शहरात दहशत माजवणारा कुख्यात डॉन बाबा फरजान यांच्या मिटमिटा येथील बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली. तब्बल 21 तास चाललेल्या या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने, शस्त्रसाठा आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली. बंगल्यातील दोन खोल्यांमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड आढळून आली. विशेष म्हणजे, या रोकडीत 100 रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पैशांचा इतका मोठा साठा पाहून धाड टाकणारे पोलिसही काही काळ चक्रावून गेले. याशिवाय 21 लाख रुपयांचे सोने आणि 8 लाख रुपयांची चांदी जप्त करण्यात आली.

एवढ्यावरच कारवाई थांबली नाही. पोलिसांनी बंगल्यातून 4 रायफल, 500 काडतुसे, तलवारी, चाकू आणि इतर घातक हत्यारे ही जप्त केली. या सर्व शस्त्रसाठ्याची तपासणी सुरू असून, त्यासाठी आवश्यक परवाने होते की नाही, याचाही तपास केला जात आहे.

पाच मशीन लावून मोजावी लागली रोकड

जप्त करण्यात आलेली रोकड इतकी मोठी होती की ती मोजण्यासाठी पोलिसांना पाचपेक्षा अधिक नोटा मोजण्याची यंत्रे (Cash Counting Machines) मागवावी लागली. अनेक तासांच्या प्रक्रियेनंतर रोकड मोजण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, ही रक्कम बेहिशेबी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बाबा फरजान यांच्या नावावर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे आणखी मालमत्ता आहे का, तसेच या पैशांचा स्रोत काय आहे, याचा तपास सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि शस्त्रसाठा सापडल्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांपासून ते गुन्हेगारी नेटवर्कपर्यंत सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, डॉनच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरात झालेल्या या कारवाईमुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांच्या धाडीत काय जप्त करण्यात आले?

    Ans: सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड, 21 लाखांचे सोने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, 500 काडतुसे आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली.

  • Que: ही कारवाई किती वेळ चालली?

    Ans: गुन्हे शाखेची धाड तब्बल 21 तास सुरू होती.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कशावर केंद्रित आहे?

    Ans: जप्त रोकडचा स्रोत, ती बेहिशेबी आहे का, तसेच डॉनचे आर्थिक आणि गुन्हेगारी नेटवर्क याचा पोलिस सखोल तपास करत आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar mountain of cash found in dons bungalow thrilling 21 hour raid hoard of gold silver and weapons seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
3

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.