Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: लग्नाचं आमिष! 3 लाख घेत कोर्टात नोटरी लग्न… आणि सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!

कोर्टात नोटरी लावून लग्न केलेली नवरी सासरी जाताना अर्ध्या रस्त्यात फरार झाली. मुलाकडून 3 लाख रुपये घेऊन विश्वासघात केला. फसवणूक का केली? कोणासोबत पळाली? यामुळे कुटुंब हादरले असून पोलिसांत तक्रार दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 11:03 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलाने विश्वास ठेवून 3 लाख दिले
  • कोर्टात नोटरी करून लग्न पूर्ण
  • सासरी जाताना नवरी गायब
छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आधी लग्न करण्यासाठी ३ लाख रुपये मागितले, कोर्टात नोटरीद्वारे लग्न लावलं, नंतर सासरी निघाल्यानंतर नवरीने अर्ध्या रस्त्यातून पळून गेली. ही घटना वाळूज परिसरातील बजाजनगर येथे घडली. याप्रकरणी पीडित शेतकरी अशोक बांदल यांनी तक्रार नोंदवली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

काय नेमकं प्रकरण?

शेतकरी अशोक बांदल हे काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होते. याच दरम्यान अशोक यांची अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली. अशोकने त्याच्याजवळ लग्नाची इच्छा व्यक्त केली. तर अरविंदने त्यांच्या गावाकडे चांगल्या मुलींची स्थळे असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सअॅपवर दोन ते तीन मुलींचे फोटोही अशोकला पाठवले. त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोक बांदलने पसंत केली होती. माया ही आपल्या आई आणि भावासोबत राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे असे अरविंदने अशोकला सांगितले. मात्र अरविंदने लग्न जुळवून देतांना एक अट घातली. ते म्हणजे लग्न करण्यासाठी 3 लाख रुपये स्त्रीधन द्यावे लागेल. अशोकने ते अट मान्य केली आणि लग्न करण्याचे ठरवले.

एकदा मुलाच्या नातेवाईकांना बोलवून मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून घेण्याचे ठरले. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अशोक बांदल, त्याचा चुलतभाऊ आणि इतर नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी गेले. तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यांनतर छत्रपती संभाजीनगरातील; कोर्टात वकील शैला लालसरे यांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरदेव-नवरी स्वखुशीने विवाह करत असल्याची नोटरी केली. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा सविता शिंदे यांच्या घरी परतले. अशोक बांदलने 1 लाख 45 हजार रुपये फोन पे द्वारे केले आणि 1 लाख 55 हजार रुपये रोख असे 3 लाख रुपये अरविंदला दिले.

अरविंदला पैसे मिळाल्यानंतर मुलीची आई सविता शिंदे यांनी मायाला आजच सोबत घ्या, उद्या गावाकडे लग्न लावून घेऊ” असे म्हंटले. त्यानुसार मायाला कारमध्ये बसवून सर्वच निघाले. पण काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून पांढरी कार ओव्हरटेक करून समोर आडवी लावली. ही कार विना क्रमांकाची होती. या कारमधून चार व्यक्ती उतरले. नवरदेव अशोकच्या कारमधून माया उतरली आणि त्या कार मध्ये बसली. काही क्षणात कार गायब आणि नावरीही गायब झाली. हे सगळं झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे अशोक बांदल यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहे.

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवरी नेमकी कशी फरार झाली?

    Ans: सासरी जाताना उतरली आणि परत आलीच नाही.

  • Que: किती पैशांची फसवणूक झाली?

    Ans: मुलाकडून जवळपास 3 लाख रुपये घेऊन पळाली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: फसवणूक प्रकरणाची नोंद घेऊन संशयितांच्या लोकेशनचा शोध सुरू केला

Web Title: Chhatrapati sambhajinagar notary marriage in court for 3 lakhs and while going to in laws the bride leaves halfway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात
1

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

Accident: भीषण अपघात! नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस कोकण सहलीवरून परतताना 20 फुट दरीत  कोसळली; चौघांची प्रकृती गंभीर
2

Accident: भीषण अपघात! नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस कोकण सहलीवरून परतताना 20 फुट दरीत कोसळली; चौघांची प्रकृती गंभीर

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला
3

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या
4

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.