गौरी पालवे यांनी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर गौरीच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवरती गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. तपासात पोलिसांच्या हाती महत्वाची सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहे. एवढेच नाही तर अनंत गर्जेच्या शरीरावरती असलेले जखम यांच्या बाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?
अनंतच्या शरीरावर २८ जखमा
अनंतच्या शरीरावर २८ जखमा आढळल्या आहेत. या जखमा ताज्या असल्याचे समोर आले आहे. या जखमा गौरी पालवे आणि अनंतच्या झटापटीत झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अनंतची पोलिग्राफ टेस्ट केली जाणार आणि मानसशास्त्रीय तपास केली जाणार आहे. याप्रकरणी माध्यमातून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाणार आहे. आवश्यक असल्यास अनंतची पोलिस कोठडी अधिकार अबाधित राहावेत, अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती आहे.
कश्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले?
गौरी पालवे हिच्या मृत्यू झाल्याची बातमी अनंत गर्जेला समजताच त्याने आपलं डोकं भिंतीवर आपटलं होत. यामुळेच त्याला जखम झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे. त्याचबरोबर अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळी मधून आत प्रवेश करता येतो का? याचं प्रात्यक्षिक देखील दाखवायला सांगण्यात आलं होतं.
अंनतच्या जुन्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला
वरळी पोलिसांनी अनंत गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला असल्याचे समोर आले आहे. अनंतसोबत 2022 पासून कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, असा जबाब महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे. एफआयआरमध्ये अनंतच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता पर्यंत अनंत गर्जे याला कोर्टात तीन वेळा हजर करण्यात आले आहे.
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी
Ans: मुख्य संशयित तिचा पती अनंत गर्जे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Ans: त्याच्या शरीरावर 28 ताज्या जखमा असून त्या दोघांतील झटापटीदरम्यान झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Ans: CCTV फुटेज, घरात प्रवेशाचे प्रात्यक्षिक, अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल हे तपासातील महत्त्वाचे पुरावे आहेत.






