काय घडलं नेमक?
आरोपी सुराजकुमार गुप्ता हा स्टेशनवर मुलांना एकटे पाहून त्यांना चॉकलेटचं आमिष देऊन त्यांना फसवून जाण्याच्या तयारीत होता. ज्यावेळी त्याने मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवलं त्यावेळी त्यांच्या त्यांच्यातील एक मुलगी जोरजोरात रडू लागली.मुलीच्या रडण्याने स्टेशनवरील प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला हटकलं पण तो मुलांना स्वतःसोबत घेऊन जात होता आणि कथित स्वरुपात स्वतःच्याच म्हणण्यावर अडून बसला होता.आरोपी मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुलांकडून प्रवाशांना समजली तेव्हा त्यांनी आरोपी सूरजला चोप दिला आणि विठ्ठलवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या
पतीला देण्यासाठी गेली होती जेवण…
पीडित मुलांची आई ही घरकाम करते. ती आपल्या दोन मुली आणि एका मुलाला काही वेळासाठी रेल्वे स्टेशनवर सोडून शांतीनगर परिसरात काम करत असलेल्या पतीला दुपारचे जेवण देण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान अपहरणाचा हा सगळा घडला.
किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना
डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी धक्कदायक घटना घडली. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती आणि पोपट धाहीजे हुए दाम्पत्य मूळचे जालना येथील रहिवासी आहे. कामानिमित्य ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी 3 अपत्ये आहेत. बुधवारी सकाळी ज्योती आणि पोपट यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणाच्या रागात पोपट याने ज्योतीचा गळा दाबून हत्या केली.
शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरवात केली. आरोपी पती पोपट धाहीजे हा हत्येनंतर घटनास्थळावरून फरार झाला. मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, पोलीस कसून शोध घेत आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतर समोर येणार आहे. पोलीसांनी मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Ans: घटना मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर घडली.
Ans: आरोपीने मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
Ans: एका मुलीच्या रडण्यामुळे प्रवाशांना संशय आला आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.






