Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा; हर्सूल तलावात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

छ. संभाजीनगरजवळील हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 08:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हर्सूल तलावात चार तरुण बुडून मृत
  • अग्निशमन दलाची शोधमोहीम, मृतदेह बाहेर
  • दोघांची ओळख पटली, तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख पटविण्याचा काम पोलिसांकडून होत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

काय घडलं नेमकं?

रविवारची सुट्टी असल्याने हे सर्व तरुण हर्सुल तलावात पोहोण्यासाठी गेले होते. मात्र रविवारचा दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा ठरला. सुरुवातीला अग्निशामक दलाला तीन तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाच्या मदतीने बचावकार्य करत तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.

याचवेळी तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने तेथेही शोधमोहीम राबवली असता चौथ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यात आढळून आला.

पोलीस तपास सुरु

मृतांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. चारही तरुणाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारा तरुण हा टँकर,e व्यवसाय करत होता. दीड वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेले त्याचा ट्रक चोरीला गेला होता. मात्र, ट्रक अद्याप सापडला नसतानाही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो आर्थिक तणावात होता. या नैराश्यातून संदेशने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?

मी संदेश दिनकर गवळी आज दिनांक 2.4.2026 रोजी माझी जीवनयात्रा समाप्त करत आहे. त्यासाठी चिकलठाणा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. ज्याने माझा ट्रक चोरला त्याच्याकडून लाच घेऊन पोलिसांनी त्याला साथ दिली. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणी जबाबदार नसून सामान्य लोकांच्या सेवेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. माझा एमएच 46 पी 2797 हा ट्रक 6 ऑक्टोबर 2024 रोजी चोरीला गेला होता. या ट्रकवर कोटक बँकेचे लोन असून इन्शुरन्स नसल्याने ते पैसे मला भरावे लागत आहेत. या अपयशाचा शिक्का माझ्या माथी बसल्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, कोणालाही त्रास देऊ नये. माझ्या शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. माझे कोटक बँकेचे गाडीसोबत आलेला इन्शुरन्स आहे, त्याची मदत घ्यावी. तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर.

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छ. संभाजीनगरजवळील हर्सूल तलावात.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

  • Que: प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले व पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar the joy of swimming turns fatal 4 youths drown in harsul lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
2

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.