Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: चुकीचा दरवाजा ठोठावला अन् नर्ससोबत होत्याच नव्हतं झालं…, सामूहिक लैंगिक अत्याचार करत केला घात

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार झाला. वेदांतनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३ आरोपींना अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 05:24 PM
प्रसिद्ध हॉटेलमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार (Photo Credit- X)

प्रसिद्ध हॉटेलमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर हादरले!
  • प्रसिद्ध हॉटेलमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार
  • वेदांतनगर पोलिसांनी ३ तासांत नराधमांच्या आवळल्या मुसक्या
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे स्टेशन रोडवरील ‘ग्रेट पंजाब’ हॉटेलमध्ये एका ३२ वर्षीय नर्सवर सामूहिक अत्याचार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

पीडित महिला शहरातील एका नामांकित रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. १७ डिसेंबर रोजी रात्री पैशांच्या कामासाठी ती तिचा मित्र संतोष शिंदे याला भेटण्यासाठी ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली होती. दोघे रूम क्रमांक १०५ मध्ये थांबले होते.

चुकीचा दरवाजा ठोठावला आणि घात झाला

मद्यप्राशन केलेले असल्याने पीडिता काहीशी नशेत होती. रात्री ११ च्या सुमारास फोनवर बोलण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली. मात्र, परत जाताना तिने चुकून १०५ ऐवजी शेजारील रूम क्रमांक २०५ चा दरवाजा ठोठावला.

हे देखील वाचा: Navi Mumbai Crime : आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर

नराधमांनी साधली संधी

त्या खोलीत किरण राठोड, घनश्याम राठोड आणि ऋषिकेश चव्हाण हे तिघे मद्यप्राशन करत बसले होते. आपण चुकीच्या खोलीत आलोय हे लक्षात येताच पीडिता बाहेर पडू लागली, मात्र आरोपींनी “तुझा मित्र इथेच आहे” असे खोटे सांगून तिला आत बोलावले. तिथे तिला पुन्हा दारू पाजून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई

१८ डिसेंबर रोजी पहाटे मद्याचा अंमल ओसरल्यावर पीडितेला आपल्यासोबत घडलेला प्रकार समजला. तिने हिंमत दाखवून थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पीडितेला आरोपींची नावे माहित नव्हती. मात्र, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आरोपीचा माग काढला. त्यानंतर काही वेळातच तिन्ही नराधमांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. घनश्याम भाऊलाल राठोड (२७, रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी)
२. किरण लक्ष्मण राठोड (२६, रा. भानुदासनगर)
३. ऋषीकेश तुळशीराम चव्हाण (२५, रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी)

हे देखील वाचा: Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर

Web Title: Chhatrapati sambhajinagar the vedantnagar police apprehended the culprits within 3 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • gang raped

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश
1

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक
2

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
3

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…
4

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.