नाशिक: नाशिकचं बिहार होत आहे का? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. कारण नाशिकमध्ये एकाच दिवशी तीन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सतत गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातून सतत खुनाचे सत्र सुरूच आहे. आता पोटच्याच पोराने जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने गाळा आवळून हत्या केली. इतकंच नाही तर हे कृत्य केल्यानंतर मारेकरी मुलाने पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून आपण आईची हत्या केल्याची कबुली दिली. हि घटना अकरा-बाराच्या सुमारास नाशिकरोड शिवाजी नगर येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे
Mumbai ED Raids : मुंबईत 8 ठिकाणी ईडीकडून छापेमारी, तर देशभरात 15 ठिकाणी छापेमारी; नेमकं कारण काय?
दरम्यान शहरात हि एकच घटना नाही घडली.आणखी दोन हत्येचा गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.यातील दोन खून हे कौटुंबिक कारणांमुळे झाल्याचं समोर आले आहे. काल पहाटे उपनगर परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. त्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू असतानाच, सातपूर परिसरात दुपारी पुन्हा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या आईचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु या दोन घटनांनंतर शहरात पुन्हा रात्री उशिरा हत्या करण्यात आली.
सध्या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी सुरू असून, आरोपींच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे. उपनगर, सातपूर आणि नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या सलग तीन खुनांच्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेलं आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.या खुनाच्या घटनेमुळे शहरात चाललय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर शहरातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहता नाशिकचं बिहार होतंय का? पोलिसांच्या वर्दीचा धाक संपला आहे का? असे सवाल देखील आता सर्व सामान्य नागरिकांना उपस्थित होत आहेत.
नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या
नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती हा पत्नीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नी आणि प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीचा नवरा अडथळा ठरत असल्याकने काटा काढण्यासाठी प्रियकरानं थरारक कट रचल्याच समोर आलं आहे. संतोष उर्फ छोटू काळे असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या तिघांना संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.