Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून उस्मानपुरा आणि सिंधी कॉलनीतून दोन क्रेटा कारसह ६ वाहने चोरीला गेली आहेत. विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून नागरिक धास्तावले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 13, 2026 | 03:21 PM
शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! (Photo Credit- X)

शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ!
  • एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास
  • पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Chhatrapati Sambhajinagar Vehicle Theft: छत्रपती संभाजीनगर शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या भागातून तीन कार, एक अॅपेरिक्षा आणि दोन दुचाकी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वाहनचोरी प्रकरणात संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिसांकडून या वाहन चोरट्यांना आळा घालण्यात अपयश येत असल्याने दिवसेंदिवस दुचाकी चोरी करणाऱ्यांनी आता मोठी वाहने चोरण्यावर जोर दिल्याचे दाखल होत असलेल्या गुन्ह्यावरून समोर येत आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागातून राजरोसपणे वाहन चोरीला जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाकडून तसेच स्थानिक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांकडून मात्र दुलर्क्ष होत असल्याचे दिसते.

बजाजनगर परिसरातील रोहित हॉटेल समोरून चोरट्यांनी लंपास केली

प्रकरणात डॉक्टर रविराज दिनकर पवार (४१, रा. नेहा क्लासिक अपार्टमेंट, ज्योतीनगर, उस्मानपुरा) यांची क्रेटा कार (एमएच २० डीव्ही ८३८४) ही इमारतीच्या पार्किंगमध्ये रात्री साडेबारा वाजता उभी केली होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पाहिले असता कार चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले.

तसेच सिंधी कॉलनी परिसरात राहणारे संदीप सतीषकुमार नाथानी (४५) यांनी त्यांची कार क्रेटा (एमएच २० ईजे २००१) ही राहत्या घरी प्लॉट नंबर १३७ येथे उभी केली होती. चोरट्यांनी ही कार बुधवारी रात्री लंपास केल्याचे समोर आले.

तसेच बजाजनगरातील दिशकुंजबन सोसायटीत राहणारे मल्हारी महादेव खेडकर (४५) यांची कार (एमएच २० एचएन ०८२२) १० फेब्रुवारी रोजी बजाजनगर परिसरातील रोहित हॉटेल समोरुन चोरट्यांनी लंपास केली.

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जयभवानीनगरात राहणारे मिस्तरी भागुराव बापूराव राऊत यांची दुचाकी (एमएच २६ सीएम ३०६१) ६ फेब्रुवारी रोजी राजी एमजीएम हॉस्पिटलच्या दुसऱ्या प्रवेशद्वारा समोरुन चोरट्यांनी लंपास केली.

याशिवाय क्रांतीनगर साजापूर गटनंबर परिसरात राहणारे भागवत महादू टकले यांची दुचाकी (एमएच २० एचएम १४६८) १३ जानेवारी रोजी दुपारी प्रतापचौकातून चोरट्यांनी चोरुन नेली.

सिटीचौक भागातील बारुदगरनाला येथून शमा फेरोज कुरेशी या महिलेच्या नावे असलेली रिक्षा (एमएच २० ईएफ ६५८५) ही संशयीत मेराज पटेल याने ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री लंपास केली.

याप्रकरणी अनुक्रमे उस्मानपुरा, सिडको, जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी

Web Title: Chhatrapati sambhajinagar vehicle theft six vehicles stolen including two creta cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • motor vehicle
  • Theft Case

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास
4

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.