बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
१०२ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीनंतर फ्रान्समधील लूव्र संग्रहालयाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत 'अपोलो गॅलरी' पुन्हा पर्यटकांसाठी खुली केली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव फ्रेंच राजघराण्याच्या सर्वात मौल्यवान रत्नांचा आणि…
एरंडवणे येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात तरुण राहण्यास आहे. ५ जुलै रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पौड फाटा पुलाखाली पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने मोबाईल हिसकावून पळ काढला.
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद फ्लॅट तसेच दुकाने देखील फोडली जात असून, लष्कर पोलिसांच्या पथकाने दुकान फोडणाऱ्या दोघांना सापळा रचून जेरबंद केले आहे.
सायबर चोरट्यांनी कोथरूड, नांदेड सिटी तसेच बाणेर भागातील तीन ज्येष्ठ नागरिकांची वेगवेगळ्या घटनेत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संसायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे…
Narendra Modi mask robbery : सोशल मीडियावर एक अजब चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून पोलिसही चक्रावले आहेत. राजस्थानमध्ये काही चोरांनी थेट पंतप्रधान मोदींचा मास्क घालून चोरी केल्याचे समोर…
तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तुळजापूर व सोलापूर येथून चोरीस गेलेल्या दोन स्विफ्ट डिझायर कारांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कारचोराला अटक केली आहे.
तक्रारदार हे कोथरूड भागात राहण्यास आहेत. त्यांचे धायरी येथील कॅनोलच्या शेजारी रिलायबल केमिकल या नावाने मोठे गोडाऊन आहे. त्याठिकाणी ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड (Orthophosphoric Acid) हे अॅसिड ठेवलेले होते.
सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी सागर जगदाळे तपास करत आहेत. सदनिकेच्या बाहेर पादत्राणाच्या जाळीत, कुंडीत, तसेच दरवाज्याच्या फटीत ठेवलेली चावी चोरून…
राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वरमधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या चार संशयीत आरोपींची गाडी राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कोमल स्वप्नील आहेर या आळेफाट्यावरून लोणी मावळ्याकडे एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या मागे बसलेल्या एका संशयित महिलेने शिताफीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोडल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याला चोरी करण्याचे फळ काही क्षणांतच मिळाले आहे. दुकानात घुसताना तो असा अडकला की पुन्हा कधी चोरीचा विचारही करणार नाही.
Dacia Culture : रोमानियाच्या २५०० वर्षे जुन्या डासिया संस्कृतीचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय ठेवा असलेले सोन्याचे शिरस्त्राण नेदरलँड्समध्ये सापडले आहे. इंटरपोलच्या डेटाबेसमुळे ही चोरी झालेली वस्तू सापडली.
वेदांतनगरातील अभिषेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रिती ज्ञानेश्वर शिंदे यांचे सासू-सासरे कार्यक्रमानिमित्त बुधवारी बाहेर गेले होते, तर शिंदे या मुलाला शाळेत सोडून कार्यालयात गेल्या होत्या.
दुकानासमोरील शेडमध्ये त्यांनी दुचाकी लावली. मात्र, सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम असणारी बॅग सोबत न नेता ती त्यांनी दुचाकीवरच ठेवली. तेव्हाच ही मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून उस्मानपुरा आणि सिंधी कॉलनीतून दोन क्रेटा कारसह ६ वाहने चोरीला गेली आहेत. विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून नागरिक धास्तावले आहेत.