संग्रहित फोटो
रायपूर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नवविवाहित जोडपे (Newly Married Couple) मंगळवारी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या काही तास आधी मृतावस्थेत आढळले (found dead hours before his wedding reception on Tuesday). ही घटना रायपूरच्या (Raipur) टिकरापाडा (Tikrapada) भागातील आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेनुसार, अस्लम अहमद आणि काहकाशा बानो अशी मृतांची नावे आहेत. १९ फेब्रुवारीला दोघांचे लग्न झाले होते आणि मंगळवारी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार होते.
[read_also content=”धारावी झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर अखेर नियंत्रण, १०० पेक्षा अधिक घरे जळून खाक; सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला यश https://www.navarashtra.com/maharashtra/dharavi-slum-fire-update-finally-under-control-more-than-100-houses-gutted-after-about-eight-hours-of-tireless-efforts-the-fire-brigade-succeeded-nrvb-371573.html”]
#Raipur: A newly-married couple was found dead just hrs before their wedding reception. The incident took place on Tuesday at Tikrapara.
Police said an argument broke out between the couple, following which Aslam allegedly stabbed Kahkasha to death before killing himself. pic.twitter.com/wpewGFFhK5
— IANS (@ians_india) February 22, 2023
पोलिसांनी सांगितले की, हे जोडपे त्यांच्या खोलीत लग्नाच्या स्वागत समारंभाची तयारी करत होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अस्लमने आत्महत्या करण्यापूर्वी काहकाशावर चाकूने वार केला. मृताच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा आढळून आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
[read_also content=”भयकंर! अवैध संबंधांमुळे मित्राची हत्या, रेल्वेच्या डब्यात सोडला मृतदेह, पाटणा रेल्वे एसपींनी घेतलं क्राईम पेट्रोलचं नाव; म्हणाले हेच पाहून गुन्हे वाढले https://www.navarashtra.com/crime/horrible-friend-killed-in-illegal-relationship-patna-rail-sp-said-crimes-are-increasing-after-seeing-crime-patrol-news-nrvb-371561.html”]
ते म्हणाले, दाम्पत्याचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक तेथे पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. त्याचवेळी घरातील एक सदस्य खिडकीतून खोलीत शिरला. पोलिसांनी सांगितले की, खोलीत प्रवेश केल्यावर कुटुंबीयांना हे जोडपे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेले दिसले. रायपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.