टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी
काय नेमकं प्रकरण?
भानू चंद्रीर रेड्डी (बाबू रेड्डी) आणि त्यांची पत्नी शाझिया अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नावे आहेत. दोघेही तेलंगणाचे रहिवासी होते. ते एका खासगी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते.पती भानूने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. भानू बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याने आणि वारंवार फोन करुनही प्रतिसाद देत नसल्याने ती सावध झाली आणि तिने सकाळी साधारण ७.३० वाजता तिने इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना घरात बोलावलं. दरवाजा तोडून सर्वांनी आत प्रवेश केला असता, त्यांना भानू चंदर रेड्डी हा छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर अवघ्या २० मिनिटात पत्नी शाझियाने त्यांच्या अपार्टमेंटच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारली.नवऱ्याने आत्महत्या केली. आपण सर्वकाही गमावलो आहोत अशी भावना तिच्या मनात आली. तिनेही इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांना तपासादरम्यान एक सुसाईड नोटही सापडली आहे. भानुने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. प्राथमिक निष्कर्षांवरुन भानू अनेक तणावांचा सामना करत असल्याचं दिसतं. आरोग्याच्या समस्यांसह बेरोजगारीशी संबंधित अँक्झायटीचाही समावेश होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वैवाहिक जीवनातील वादामुळे दोघांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे. पोलीस या घटनेतील सर्व पैलूंचा तपास करत आहे.
लग्नाला अडीच वर्ष
भानू चंदर रेड्डी अमेरिकेत नोकरी करत होते; त्यांना वार्षिक ८० लाख रुपये पगार होता. मात्र गेल्या वर्षी ‘एआय’मुळे झालेल्या नोकरकपातीमध्ये त्यांची नोकरी गेली होती. याउलट शाझियाला नुकतीच ‘आयबीएम’मध्ये नोकरी मिळाली होती. हे जोडपं आठ महिन्यांपूर्वीच बंगळुरुला स्थलांतरित झालं होतं. त्यांच्या लग्नाला अडीच वर्ष झाली होती, मात्र शाझियाच्या माहेरी या लग्नाची कल्पना नव्हती.
Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
Ans: बेंगळुरूतील कोथनूर परिसरात.
Ans: वैवाहिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाज.
Ans: घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.






