Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई

रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एम.बी. रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी दीड लाखांची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2026 | 01:11 PM
नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

मुरगूड : हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एसटी बसस्थानक परिसरात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरगूड परिसरात खळबळ उडाली.

मुरगूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एम.बी. रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी 50 हजार रुपये आरोपीने यापूर्वी स्वीकारले होते. उर्वरित 80 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 40 हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार, संबंधित ठेकेदार लाच रक्कम घेऊन मुरगूड येथे आला असता, आरोपीने ही रक्कम मुरगूड एस. टी. बसस्थानकात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले.

हेदेखील वाचा : Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. यावेळी लाच रक्कम व आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. यानंतर आरोपीला मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक तत्काळ रवाना करण्यात आले असून, घरझडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

7 हजारांची लाच स्वीकारताना एकाला पकडले

दुसऱ्या एका घटनेत, राज्यात अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी लाच स्विकारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाढत्या घटना रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. अशातच आता शिरूरच्या पूर्व भागातील शिरसगाव काटा सजातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४ ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. यामुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : Indian Army officer Arrested: संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या घरी कॅश’चा डोंगर सापडला, नोटा मोजण्यासाठी CBIची धावपळ

Web Title: City engineer was caught red handed while accepting a bribe of 40000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news
  • kolhapur news

संबंधित बातम्या

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
1

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक
3

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड
4

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.