Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 19 येथील बांधकाम साईटवर प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीलबंद कारवाई करण्यात आली आहे. बांधकामादरम्यान आवश्यक प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित यंत्रणेने ही कारवाई केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 05:14 PM
प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Follow Us
Follow Us:
  • तुर्भेत बांधकाम व्यावसायिकावर कारवाई
  • प्रदूषण नियमावलीच्या उल्लंघनामुळे साईटला टाळे
  • सेक्टर 19 तुर्भेतील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : शहरातील वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचे (SOP) उल्लंघन केल्याप्रकरणी तुर्भे सेक्टर 19 येथील मे. शेलटॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या बांधकाम साईटवर महापालिकेने सीलबंद कारवाई केली आहे. यापूर्वी नोटीस बजावून सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, आवश्यक सुधारणा न झाल्याने अखेर महापालिकेने साईट सील केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रदूषणाविरोधात कठोर पावले

मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका क्र. 3/2023 मध्ये 24 डिसेंबर 2025 रोजी आदेश देत शहरांमधील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रकल्पांसाठी प्रदूषण नियंत्रणासंदर्भात नियम निश्चित केले आहेत.

Navi mumbai Crime: प्रेमसंबंधातून घडलं धक्कादायक कृत्य; गार्डनमध्ये भेट अन् मोठा ट्विस्ट

बांधकामाच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तसेच ब्लास्टिंगच्या कामांसाठी अवलंबायची मानक कार्यप्रणाली महापालिकेने जाहीर केली होती. या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही सर्व बांधकाम व्यावसायिक आणि बांधकामधारकांना देण्यात आल्या होत्या.

नियम मोडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा

महापालिकेने निश्चित केलेल्या प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळलेल्या बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटीस मिळाल्यानंतरही ज्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नाहीत, अशा बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाकडून बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

आयुक्तांच्या पाहणीत नियमांचे उल्लंघन उघड

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तुर्भे सेक्टर 19 मधील भूखंड क्रमांक 11 येथील मे. शेलटॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या बांधकाम साईटची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान संबंधित बांधकाम साईटवर मानक कार्यप्रणालीतील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित कंपनीला प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.

सुधारणा न झाल्याने साईट थेट सील

नोटीस बजावल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून नियमांनुसार आवश्यक सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, साईटवर अपेक्षित सुधारणा झाल्याचे आढळून न आल्याने तुर्भे विभाग कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला. संबंधित बांधकाम साईट सीलबंद करण्यात आली. ही कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांचाही कारवाईत सहभाग होता.

पोलीस आणि अतिक्रमण निर्मूलन पथकही तैनात

सीलबंद कारवाईच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

बांधकाम व्यावसायिकांना नियमपालनाचा स्पष्ट संदेश

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने बांधकामातून निर्माण होणारी धूळ, आवाज आणि इतर प्रकारचे प्रदूषण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या मानक कार्यप्रणालीचे पालन करणे बांधकाम व्यावसायिकांसाठी आवश्यक आहे. नोटीस आणि दंडात्मक कारवाईनंतरही नियमांचे पालन न केल्यास थेट साईट सीलबंद करण्याची कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश तुर्भेतील या कारवाईतून देण्यात आला आहे.

Tarun Tejpal: 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश

Web Title: Construction site sealed sector 19 turbhe for violating pollution control rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • crime
  • police
  • pollution

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
3

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
4

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.