Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

Bribe Case: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या तलाठी आणि कोतवाल या दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2025 | 08:39 PM
Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट...

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट...

Follow Us
Close
Follow Us:

लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक
कोर्टाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी
तलाठ्याला रंगेगेहाथ पकडण्यात आले

इचलकरंजी: वारसा नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या शहापुर येथील तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे आणि कोतवाल नेताजी केशव पाटील या दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे दिली होती. तर नांव नोंदणीसाठी गट नं. ७२९ हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानुसार गुरुवारी स्टेशन रोडवरील एका चहा टपरीवर तक्रारदाराकडुन १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

झेडपीच्या लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला अटक

अँटी करप्शन ब्युरो (ACB) सोलापूर विभागाने गुरुवारी (दि.30) झेडपी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार पाडली.

Solapur News : झेडपीच्या लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला अटक; मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारांची लाच
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे येळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने त्यासंबंधित एक लाख रुपयांच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता. तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी व रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन टक्क्यांप्रमाणे २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली.

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

सदरची तक्रार 30 ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली. त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता खरबस यांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा परिषद मुख्यालय येथील पोर्चमध्ये सापळा लावून कारवाई करण्यात आली. दरम्यान, तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस यांना ACB च्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे.

Web Title: Court gave one day custody to talathi about 10 thousand bribe ichalkaranji crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला
1

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा
2

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…
3

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…

‘तू भेटायला का आला नाही’ असे म्हणत तरुणाला दगडाने मारहाण; डोकंही फोडलं अन्…
4

‘तू भेटायला का आला नाही’ असे म्हणत तरुणाला दगडाने मारहाण; डोकंही फोडलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.